शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस,पिपळगाव,,पेठला पाणीच पाणी

डी.पी.अहिरे,पिंपळगाव बसवंत
रविवार, 4 ऑगस्ट 2019

:नाशिकः पिंपळगाव बसवंत- नाशिक शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे., नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शहरात गोदावरीचे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी होऊ लागल्याने पुलावर एकच गर्दी उसळली आहे. त्याचा वाहतूकीवर परिणाम जाणवू लागला. भांडी बाजारात पाणी शिरल्याने साहित्य हलविण्यासाठी दुकानदारांची तारांबळ उडालेली पहायला मिळाली. वालदेवी,दारणा,नासर्डी नदीलाही पूर आला आहे.पिंपळगाव बसवंत परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चांदोरी सायखेडा भागात प्रांत डॉ अर्चना पठारे तहसीलदार दीपक पाटील काल सकाळ पासून चांदोरीस तळ ठोकून आहे.ग्रामपालिका चांदोरी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती विविध मंडळे पूरग्रस्तांना मदत करण्यास आघाडीवर पेठ कडक नदीवरील कोपुर्ली खु॥ जवळील कोल्हापुरी बंधारा वाहुन गेला बरोबरच ५०ते ६० वीजपंप वाहुन गेले.पेठ मधे रात्रीपासून लाईट नसल्याने मोबाईल नेटवर्क बंद संपर्क होण्यास अडचण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा