नाशिकमध्ये गोदावरीला महापूर ....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नाशिक : मुसळधार पाऊस आणि त्रम्बकेश्वरमधील अतिवृष्टीने गोदावरीला महापूर आला. 2008, 2016 सारखी स्थिती निर्माण झाली असून गाडगे महाराज पुलावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली.
दुतोंडी मारुती बुडाला की, पूर आणि नारोशंकर घंटेला पाणी लागताच महापुर असा गोदावरीच्या पुराचा ठोकताळा नाशिककरांचा असतो, आता काही वेळापूर्वीच नारोशंकर घंटेला महापुराचे पाणी लागले. दिल्ली दरवाजा परिसरात महापुराचे पाणी पोचले असून बालाजी मंदिर या पाण्याने गाठले आहे, वस्त्रांतर गृहाच्या पहिल्या मजल्यावर पाणी दाखल झाले आहे. प्रशासनाने नदी काठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
4 तालुक्यात अतिवृष्टी
...

आदिवासी पट्यातील 4 तालुक्यात आज सकाळी 8 ला संपलेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली. इगतपुरी तालुक्यात 220, त्रम्बकेश्वरमध्ये 315, पेठ मध्ये 200, सुरगाण्यात 180, दिंडोरीत 68, नाशिकमध्ये 84 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे नांदूरमध्यमेश्वर मधून 84 हजार क्यूसेस पाणी
...
मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर मधून 21 हजार, दारणा तुन 26 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर मधून 84 हजार क्यूसेस विसर्ग सुरू आहे

1969 च्या महापुराच्या आठवणी
9 सप्टेंबर 1969 च्या गोदावरी च्या महापुराने हाहाकार उडवला होता. सरकरवाड्याच्या पायऱ्या बुडाल्या होत्या. खांदवे गणेश पर्यंत पाणी पोचले होते, अहिल्यादेवी होळकर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आताचा पाऊस कायम राहिल्यास त्या महापुराची आठवण नाशिककरांना होईल, असे सतीश शुक्ल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा