इगतपुरीत संततधार,दारणा,मुकणे धरणांतून विसर्ग वाढविला.

ज्ञानेश्वर गुळवे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अस्वली स्टेशन: इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. आज दिवसभरात ६५मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर ४८२५मिमी विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे तर वार्षीक सरासरीच्या १४५.०८टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ८७१कुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असुन पाऊस असाच सुरु राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ करण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. अतिवृष्टी नंतरच्या तीन आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा कालपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात मोठया प्रमाणात पाणी साचून नदी नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले आहेत.

भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर दारणाधरणा बरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा