शिंदे गावातील २३ घरांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नाशिक रोड - नाशिक- पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या शिंदे गावामधील २३ घरांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आज बुलडोझर फिरवला. सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती.

नाशिक रोड - नाशिक- पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या शिंदे गावामधील २३ घरांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आज बुलडोझर फिरवला. सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती.

नाशिक- पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणास काही महिन्यांपासून गती मिळाली; परंतु शिंदे गावाजवळ पाचशे मीटरचा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने काही महिन्यांपासून येथील काम रखडले होते. पाचशे मीटरवरील रस्त्यालगतची घरे वाचाविण्यासाठी ग्रामस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण न्यायालयाने ग्रामस्थांची मागणी फेटाळली आणि आज अखेर न्यायालयाच्या आदेशानेच शिंदे गावालगत असलेली दुकाने, घरे जमीनदोस्त करण्यात आली. अनेक ठिकाणी घरे पाडत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य रस्त्याच्या मध्य ठिकाणापासून खुणा केलेल्या जागेपेक्षा अधिक प्रमाणात घरे पाडण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली. त्यामुळे ग्रामस्थांनी अतिक्रमण पाडण्यास विरोध केला.

या मोहिमेत उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, राहुल पाटील, तहसीलदार जयश्री अहिरराव, उपविभागीय अधिकारी एच. डब्ल्यू. मोरे., वाय. ए. पाटील, एन. यू. चौधरी, ए. पी. कोटकर, प्रकल्प अधिकारी सुनील भोसले, मंडल अधिकारी सईद शेख, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अधिकारी आर. एस. सोमवंशी, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, अशोक भगत, मधुकर कड यांच्यासह ११ पोलिस निरीक्षक व ११३ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

‘मार्किंगपेक्षा अधिक भिंती पाडल्या
सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने भूसंपादन केले. जमीनदोस्त केलेल्या काही घरमालकांना नोटिसाही बांधकाम खात्याने दिल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी मार्किंग असतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी करीत पोलिस बळाचा वापर करून घरांच्या अधिक भिंती पाडून ग्रामस्थांवर अन्याय केला. काहींना नोटिसा किंवा पूर्वसूचना नसताना त्यांचे अतिक्रमण काढले, असा आरोप अतिक्रमित ग्रामस्थ व संजय तुंगार यांनी केला.

सहा तास वाहतूक कोंडी
सकाळी दहापासून दुपारी चारपर्यंत महामार्गावरील चिंचोली फाटा ते नाशिक रोडदरम्यान वाहतुकीची कोंडी झाली. या काळात शिर्डी, पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बिटको चौकातून भगूरमार्गे सिन्नरकडे वळविण्यात आली. नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी सिन्नरहून शिंदेजवळील नायगाव फाट्यापासून जाखोरी, कोटमगावमार्गे वाहतूक वळविण्यात आली. 

यांचे काढले अतिक्रमण 
संजय तुंगार, अनुसया भिसे, गंगूबाई तुंगार, सिंधूबाई सोनवणे, भगीरथीबाई पाळदे, गणेश जाधव, अनिल पाळदे, विलास बोराडे, पुष्पा देशपांडे, शांताराम झाडे, सोमनाथ बोराडे, मीराबाई जाधव, संजय काकड, सुधाकर जाधव, विजय जाधव, शरद शिंदे, सरूबाई सोनवणे, गौतम शिवदे, शांताराम झाडे, सोमनाथ तुंगार, तसेच मारुती मंदिर ट्रस्ट जागेचा समावेश आहे. 

Web Title: 23 houses of the hammer