पोलिस आयुक्तालयालाच हवालदाराकडून 24 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नाशिक - पोलिस आयुक्तालयातील हवालदाराने आस्थापना विभागांच्या वीजबिल भरणा करण्यामध्ये 24 लाख 81 हजार रुपयांची अफरातफर केल्याबद्दल त्यास अटक करण्यात आली. संशयित पोलिस हवालदार हिंमत रघुनाथ निकम यास न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

नाशिक - पोलिस आयुक्तालयातील हवालदाराने आस्थापना विभागांच्या वीजबिल भरणा करण्यामध्ये 24 लाख 81 हजार रुपयांची अफरातफर केल्याबद्दल त्यास अटक करण्यात आली. संशयित पोलिस हवालदार हिंमत रघुनाथ निकम यास न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

पोलिस आयुक्तालयातील आस्थापना विभागांची विजेची बिले भरण्याचे काम हवालदार निकम याच्याकडे होते. निकम याने नऊ मार्च 2014 ते दोन सप्टेंबर 2015, तसेच जून 2016 पर्यंत बिल भरण्याचे काम केले. मात्र, ते करताना पावत्यांमध्ये खाडाखोड केली. कमी रक्कम भरून पावत्यांवर मात्र संपूर्ण बिल भरल्याचे दाखविण्यासाठी खाडाखोड केली. हा प्रकार लेखापरीक्षणाच्या अहवालात उघडकीस आले आहे. आयुक्तालयाचे मुख्य लिपिक कृष्णा आहिरे यांनी शनिवारी (ता. 4) रात्री सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर निकम यास पोलिसांनी अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयात त्यास आज हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

आयुक्तालयात भ्रष्टाचार 
काही दिवसांपूर्वीच पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासाच्या खोल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तीला भाड्याने दिल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. सायबर सेलच्या दोन पोलिसांनी संगमनेरच्या सराफाला खोटे सोने आणल्याचे भासवून 14 तोळे सोने लंपास केले. आता वीजबिलात 24 लाखांच्या अफरातफरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. कायद्याचे रक्षकच पोलिस दलाला गंडा घालू लागल्याने कुंपणच शेत खात असल्याची स्थिती आहे. 

Web Title: 24 lakh discipleship from police constable