२५ कोटींतील विकासकामांना मुहूर्त

Jalgav-Corporation
Jalgav-Corporation

जळगाव - शहराच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला २५ कोटींचा निधी दिला होता. दोन- अडीच वर्षे यातील कामे रखडल्यानंतर आता ते मार्गी लागत आहेत. त्यातून १८ कोटींच्या कामांसाठी विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली असून, या कामांना सुरवात झाली नव्हती. आता पुढील आठवड्यात विकासकामांना प्रारंभ होणार आहे. तर उर्वरित ७ कोटींच्या कामांसाठी महासभेची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जाईल.

जळगाव जिल्हा दौऱ्यावर तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता शहराच्या विकासासाठी २५ कोटींचे अनुदान दिले होते. यात बांधकाम, विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागासाठी खर्च करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १८ कोटींच्या कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील  १३ कोटी ५० लाख रुपये बांधकाम विभागांतर्गत खर्च होणार असून, मक्तेदारांस कार्यादेश दिले आहे. महापौर व उपमहापौर हे मुंबई येथून आल्यानंतर विकासकामांचा प्रारंभ केला जाईल. 

१८ कोटींतून होणार ही कामे
साडेतेरा कोटी रुपयांच्या खर्चातून १० कोटी रुपयांच्या गटारी, एसएमआयटी कॉलेज रस्त्यावरील लहान नाल्यासाठी ५५ लाख रुपये,  ममुराबाद लेंडीनाला व इतर पुलांच्या बांधणीसाठी ३ कोटी रुपये, इच्छादेवी ते डी मार्ट तसेच कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौकापर्यंत दुभाजक बांधण्यासाठी ५० लाख रुपयाचे नियोजन केले आहे. नेरीनाका स्मशानभूमी येथे विद्युतदाहिनीसाठी ७ कोटी ८५ लाखांचे काम प्रस्तावित आहे.

७ कोटींचा प्रस्ताव महासभेच्या प्रतीक्षेत
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटीच्या निधीतून १८ कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित ७ कोटींच्या विकासकामांना महासभेत मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे येत्या महासभेत ७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी घेऊन अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.  या निधीतून विस्तारित भागांमध्ये विजेचे खांब उभारणे, लाइट लावणे, मनपा इमारतीत नवीन सहा लिफ्ट बसविणे, नाला मजबुतीकरण, दुभाजक बांधणे अशी कामे होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com