डीएड प्रवेशासाठी राज्यातून केवळ अडीच हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रे मिळविण्यास उशीर होत असल्याने प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण परिषदेकडे केली आहे.

इगतपुरी - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रे मिळविण्यास उशीर होत असल्याने प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण परिषदेकडे केली आहे.

डीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ३१ मे पासून सुरू झाली आहे. प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रवेशाची पहिली यादी उद्या (ता. २४) प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, आत्तापर्यंत २ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. खुल्या संवर्गातील ५० टक्के आणि मागासवर्गीय संवर्गातील ४५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना डीएडला प्रवेश दिला जात आहे. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील जागा रिक्त राहत असल्याने प्रवेश अर्ज करणाऱ्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2500 form for Ded Admission education