वैद्यकीय प्रवेश पडताळणीसाठी  राज्यात 27 केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी "सकाळ'ने आवाज उठवला होता. तसेच, वैद्यकीय शिक्षणाचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा त्यासाठी विचार का केला जात नाही, यासंबंधाने पाठपुरावा केला होता. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने त्याची दखल घेत यंदा कागदपत्र पडताळणीसाठी नाशिकसह 27 केंद्रे सुरू केली. 

"नीट' परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., फिजिओथेरेपी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र नेमक्‍या याच कालावधीत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. 5) सर्व केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे. तसेच, आज आणि उद्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शनिवारी (ता. 6) सर्व केंद्रांवर केली जाणार आहे, अशी माहिती केंद्राचे निरीक्षक डॉ. उदयसिंह रावराणे यांनी दिली. 

मुंबईत 4, नागपूरमध्ये 3, पुण्यात 2 केंद्रे 
कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुंबईत 4, नागपूरमध्ये 3, पुणे, औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रत्येकी 2 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, वर्धा, अकोला, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ येथे एकेक केंद्र सुरू आहे. दिव्यांग आणि अनिवासी भारतीयांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची व्यवस्था मुंबईतील केंद्रात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागांत केंद्र सुरू करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. 

""वैद्यकीय पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून कागदपत्र पडताळणीच्या केंद्रांची संख्या चारवरून 27 करण्यात आली आहे. त्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचाही समावेश करण्यात आला आहे.'' 
- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 centers in the state for medical entrance verification