Dhule Fraud Crime : फ्लिपकार्टचे बनावट ग्राहक दाखवून 27 लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

Dhule Fraud Crime : फ्लिपकार्टचे बनावट ग्राहक दाखवून 27 लाखांचा गंडा

शिरपूर (जि. धुळे) : फ्लिपकार्ट ब्रँडकडे ग्राहकांचा बनावट आयडी बनवून नोंदणी करीत मालाची परस्पर विल्हेवाट लावून २७ लाख ६५ हजार ७६० रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्याया दोन डिलिव्हरी बॉईजविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (27 lakh fraud by showing fake customers of Flipkart dhule news)

एन्टेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. चे कायदेविषयक कार्यकारी अधिकारी मयूर भीमराव शिंदे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटल्यानुसार, कंपनीतर्फे शिरपुरात डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर म्हणून प्रवीण भास्कर बाविस्कर (रा. गौरव हॉटेलमागे, करवंद रोड, शिरपूर) याची नियुक्ती केली होती.

त्याच्यासोबत विवेक नामदेव कोळी (रा. खामखेडा, ता. शिरपूर) काम करीत होता. जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत दोघांनी फ्लिपकार्ट ब्रॅंडचा वापर करून ग्राहकांचा बनावट आयडी तयार केला. त्याद्वारे माल मागवून त्याची परस्पर विल्हेवाट लावली. अन्य ग्राहकांना माल डिलिव्हरी करुन त्यांच्याकडून पैसे घेतले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पण कंपनीला मात्र ग्राहकाने माल परत केल्याचे दर्शवले. तथापि मालाची रक्कम किंवा माल यापैकी काहीच परत केले नाही. कंपनीने हिशेब केल्यावर तब्बल २७ लाख ६५ हजार ७६९ रुपयांची तफावत समोर आली. त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर दोघांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत कबुली दिली. शहर पोलिसांनी संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.