द्राक्ष उत्पादकांची 28 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पिंपळगाव बसवंत  - निफाड तालुक्‍यातील सोळा द्राक्ष उत्पादकांची सौद्यातील 28 लाख पन्नास रुपयांची रक्कम घेऊन परप्रांतीय व्यापारी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. द्राक्ष खरेदीपोटी दिलेले धनादेश न वटल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच तालुक्‍यातील देवपूर, दावचवाडी, रौळस पिंपरी, लोणवाडी, पाचोरे वणी, जोपुळ, रुई येथील सोळा शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे व्यापारी राजकुमार परशराम चुग (रा. अजमेर, राजस्थान) यांना उधारीवर दिली होती. त्यापोटी त्याने काही शेतकऱ्यांना धनादेश दिले होते, तर काहींना रोख रक्कम देण्याचे कबूल केले होते; परंतु बऱ्याच जणांचे धनादेश वटलेच नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सर्व शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत गाठले. येथे व्यापाऱ्याचा शोध घेतला असता, तो तेथे नसल्याचे व त्याचा मोबाईलही बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधितांनी त्याच्या मूळगावी, अजमेर येथेही तपास केला. मात्र, तो तेथेही नसल्याचे समजले. दरम्यान, द्राक्ष व्यापाऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्यासाठी सुरवातीला पोलिसांनी टाळाटाळ केली. 

Web Title: 28 lakh cheating of grape growers