टेम्पो ट्रॅव्हल्स-ट्रकच्या धडकेत तीन ठार

आल्हाद जोशी
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

एरंडोल : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो  ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोमधील तीन जण ठार झाले तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पातरखेडे गावासमोर असलेल्या आश्रमशाळेजवळ झाला. अपघातात मयत व जखमी झालेले सर्व सदस्य यावल तालुक्यातील मोरूल येथे विवाह समारंभाच्या स्वागत समारंभास जात असतांना रस्त्यावर त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागीकानी संताप व्यक्त केला.

याबाबत माहिती अशी, की ठाणे येथील सय्यद व मलिक परिवारातील सदस्य टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.०४ जी.पी.२७७७ ने मोरूळ (ता.यावल) येथे मुलीच्या विवाहाच्या स्वागत समारंभासाठी जात होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एरंडोल पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पातरखेडे गावाजवळ त्यांच्या वाहनास समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक ओ.आर.१५ एम.०७३९ ने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो मधील आरीफ मेहबूब मलिक (वय ५० रा.शादी महल हॉल समोर मुंब्रा, ठाणे), फिरोजखान रशीद खान (वय ३१ रा.जिलानी हाउस राबोडी १ ठाणे) व ताहिरा नजीर सय्यद (वय ५० रा.शाईन अपार्टमेंट, दुसरा मजला,राबोडी १ ठाणे) हे ठार झाले तर कलीम याकुब मलक (वय ४८ रा.साहेजादा अपार्टमेंट महागीरा ठाणे वेस्ट), स्वालेहा कलीम मलक (वय ४३ रा.साहेजादा अपार्टमेंट ठाणे), मकसूदअली सय्यद (वय ४४ रा.जिलानी हाउस,ठाणे), निसारअली सय्यद सय्यद (वय ७२ रा.जिलानी हाउस,ठाणे), आलमबी शेख (वय ४५ रा.जिलानी हाउस ठाणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले.

जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. पहाते पाच वाजेच्या सुमारास अपघात झाल्यामुळे झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती.त्याचवेळी सुरगाणा येथील उपनगराध्यक्षा तृप्ती चव्हाण यांचे पती दिपक चव्हाण हे मित्रांसह वाहनाने जळगावकडे जात असताना त्याना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी त्वरित वाहनातून उतरून सर्व जखमीना आपल्या वाहनातून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याने जखमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख यांनी शहरातील डॉक्टरांना अपघाताची माहिती दिल्यानंतर डॉ.फरहाज बोहरी, डॉ.मुस्तकीमखान गुलाबखान व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी त्वरित रुग्णालयात धाव घेऊन जखमींवर उपचार केले. सुमारे साडेसात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील रुग्णालयात आल्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना जाब विचारला. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे जीव वाचू शकले असते अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: 3 died in tempo travel and truck s accident