पिण्याच्या पाण्याच्या जारची दिवसाला तीन लाखांची उलाढाल

संतोष विंचू
बुधवार, 9 मे 2018

येवला : लग्नसमारंभानिमित्त मंगल कार्यालयात किंवा खरेदीसाठी दुकानात,
एवढेच काय ग्रामीण भागातील टँकरग्रस्त गावात जरी गेले या पाण्याचा सर्रास वापर होत आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतींनी देखील आरो प्लांट सुरू केल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणी प्यायला मिळत आहे. एकूणच सरासरी विचार करता येवल्यात दिवसाला सुमारे तीन लाखांपर्यंतची उलाढाल या शुद्ध जार व बाटलीबंद पाण्याच्या खरेदीवर होत असल्याचे चित्र आहे.

येवला : लग्नसमारंभानिमित्त मंगल कार्यालयात किंवा खरेदीसाठी दुकानात,
एवढेच काय ग्रामीण भागातील टँकरग्रस्त गावात जरी गेले या पाण्याचा सर्रास वापर होत आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतींनी देखील आरो प्लांट सुरू केल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणी प्यायला मिळत आहे. एकूणच सरासरी विचार करता येवल्यात दिवसाला सुमारे तीन लाखांपर्यंतची उलाढाल या शुद्ध जार व बाटलीबंद पाण्याच्या खरेदीवर होत असल्याचे चित्र आहे.

ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या या तालुक्यासह शहरात उन्हाळ्यातील पाणीटंचाई म्हणजे अग्निदिव्य परीक्षाच..यावर्षी शहरात पाच दिवसाड पाणी येत असले तरी तसे समाधानकारक चित्र आहे पण ग्रामीण भागात ६० च्या वर गावे व वाड्या टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे. त्यातच प्यायला पाणी मिळावे की घरात वापरायला हा प्रश्न घराघरात भेडसावत असल्याचे चित्र आहे. याचमुळे उत्तर पूर्व भागातील अनेक गावात जेथून मिळेल तेथूनच पाणी वापरण्यासाठी तर पिण्यासाठी मात्र जार विकत घेऊन तहान भागवली जात असल्याचे चित्र आहे.याशिवाय प्रत्येक लग्नमंडपात,मंगल कार्यालयात देखील जारचे शुद्ध व थंड पाणी वापरले जात असून एका लग्नासाठी किमान २०० ते ४०० जारची गरज भासत आहे. येवला,रेल्वे स्टेशन,बाभुळगाव, धानोरा,जळगाव नेऊर,भारमअंदरसुल आदी भागात पंधरावर वॉटर प्लांट असून याद्वारे मागेल तेथे जारद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

अशी होतेय उलाढाल...
इतर दिवसांत वीस रुपयाला मिळणारा जार आजमितीस घरपोच दिला तर चाळीस ते पन्नास रुपये तर सरासरी तीस रुपयांना विक्री सुरू आहे. दिवसाला १०० ते ५०० पर्यंत या जार प्लांट मालकाकडे मागणी असते. एकूणच सरासरी तीनशेचा आकडा गृहीत धरला तरी दिवसाला चार ते पाच हजारांवर जारची विक्री होत आहे.याशिवाय मिनरल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्यातून पाण्याची देखील वीस रुपयांनी विक्री सुरू असल्याने लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.

गावांना शुद्ध पाणी...
गावाला शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी कोटमगाव देवीचे,सायगाव,पाटोदा,अंदरसूल या ग्रामपंचायतींनी देखील आरो प्लॅन्ट सुरू केले आहे. या ठिकाणी पाच रुपयाला वीस लिटर पाणी या प्रमाणे शुद्ध पाणी नागरिकांना मिळत आहे. विशेषता महिन्याकाठी दीडशे रुपयांचे एटीएम कार्ड ग्राहकांना देण्यात आले असून ते दिवसाला सरासरी वीस लिटर पाणी या कार्डद्वारे पिण्यासाठी नेत आहे.प्रत्येक ग्रामपंचायतिकडे १०० ते ३०० पर्यत नागरीक हे शुद्ध पाणी पैसे मोजून घेत असल्याने यातूनही उन्हाळ्यात लाखों रूपयांची उलाढाल होत आहे.

"ग्रामपंचायतीने आरो प्लँट सुरू केल्यापासून गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. विशेष म्हणजे नागरिक पाहिजे तेवढे रिचार्ज मारून पाणी नेतात. प्लॅन्ट सुरू झाल्यापासून गावात साथीच्या किंवा पोटाच्या विकाराचे आजार हद्दपार झाल्याचे चित्र आहे."
- सचिन कल्लापुरे,ग्रामसेवक,कोटमगाव देवीचे

"लग्नात वापरले जाणारे जारचे पाणी व ग्रामपंचायतद्वारे आरो प्लँटने पुरवले जाणारे शुद्ध पाणी नागरीकांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत आहे.ग्रामपंचायती तर माफक दरात संपूर्ण कुटुंबाला पिण्यासाठी पाणी देत असल्याने हे प्लँट गावाला वरदान ठरत आहेत.
नाना लहरे,सामाजिक कार्यकर्ते

Web Title: 3 lacks rupees turnover a day of water jar