द्राक्ष शेतकऱ्यांना 31 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

संतप्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वडाळीभोई पोलिस ठाण्यात राजूभाई आणि पिंपळगाव बसवंतमधील त्याचा साथीदार अतुल गरुड याच्याविरोधात तक्रार नोंदविली.

चांदवड - तालुक्‍यातील जोपूळ, खडकओझर व वडाळीभोईच्या 16 द्राक्ष शेतकऱ्यांना राजस्थान येथील द्राक्ष व्यापाऱ्याने 31 लाखांना फसवत पोबारा केला. वडाळीभोई पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्याच्या सहकाऱ्यास अटक केली. 

जोपूळ, खडकओझर व वडाळीभोईतील द्राक्ष शेतकऱ्यांकडून राजस्थानचा राजूभाई सिंग (हल्ली रा. पंचवटी, नाशिक) याने 41 लाख 55 हजारांची द्राक्षे खरेदी केली. त्याने काही शेतकऱ्यांना रोख व आरटीजीएसने दहा लाख 35 हजार दिले. मात्र उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. या व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांचे 31 लाख 20 हजार 732 रुपये बाकी आहे.

संतप्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वडाळीभोई पोलिस ठाण्यात राजूभाई आणि पिंपळगाव बसवंतमधील त्याचा साथीदार अतुल गरुड याच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गरुडला अटक केली असून, त्यास न्या. शशिकांत धपाटे यांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: 31 lakh discipleship grape farmers

टॅग्स