Nandurbar News : रेवानगर येथे 33/11 केव्ही सबस्टेशनची उभारणी होणार

33 11 KV substation will be constructed at Reva Nagar nandurbar news
33 11 KV substation will be constructed at Reva Nagar nandurbar newsesakal

पुरुषोत्तमनगर (जि. नंदुरबार) : शहादा व तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वारंवार आलेल्या तक्रारी व समस्या लक्षात घेऊन शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी महावितरण अभियंत्यांसोबत शेतकऱ्यांच्या बैठका लावल्या. (33 11 KV substation will be constructed at Reva Nagar nandurbar news)

या बैठकांनुसार महावितरणने नवीन आठ सबस्टेशनला मंजुरी दिली. आमदार पाडवी यांच्याकडून मुंबई येथे मुख्य कार्यालयात वारंवार पाठपुरावा करण्यात आला.

मंजूर झालेली नवीन आठ सबस्टेशन

१) रेवानगर (ता. तळोदा)

२) मोठा धनपूर (ता. तळोदा)३) चाँदशैली (ता. शहादा)४) रामपूर (ता. शहादा)

५) गनोर (ता. शहादा)

६) बामखेडा तर्फे तऱ्हाड (ता. शहादा)

७) कळंबू (ता. शहादा)

८) सावळदा (अनरद) (ता. शहादा)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

33 11 KV substation will be constructed at Reva Nagar nandurbar news
Nandurbar News : नवापूर पोलिसांनी पकडला गॅस सिलिंडरचा साठा

जुन्या सात सबस्टेशनला नवीन जास्तीचा पॉवर ट्रान्स्फॉर्मर बसवून सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवविण्यासाठीदेखील मागणी आमदार पाडवी यांनी ऑनलाइन पोर्टलद्वारे केली आहे. त्यात तिखोरा, ससदे, डामरखेडा, मंदाणा, प्रतापपूर, सोमवल, बोरद या २२/११ केव्ही सबस्टेशनचा समावेश आहे.

शहादा-तळोदा मतदारसंघात औद्योगिक व शेतशिवारात होणारी मागणी व तरुण पिढीला सक्षम वीजपुरवठा मिळावा याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आमदार पाडवी यांनी सबस्टेशन, लाइनचे नियोजन केले होते.

यापूर्वी सबस्टेशनला धडगाव तालुक्याचा लोड म्हसावद सबस्टेशनच्या ३३ केव्ही लाइनवर होता. वरीलपैकी रेवानगर सबस्टेशनचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार असून, उर्वरित सर्व काम लवकरच मार्गी लागणार आहे. सबस्टेशनचे काम सुरू होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

33 11 KV substation will be constructed at Reva Nagar nandurbar news
Dhule News : नगाव सेवा सोसायटी निवडणुकीत ‘मविआ’ पॅनलचा दणदणीत विजय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com