बाळापूर येथील मस्तिष्क शिबिरात 378 मुलांची तपासणी

तुषार देवरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

- मुंबई च्या 30 डाॅक्टरांचे पथक
- विद्यार्थ्यांना मिळतोय आधार

देऊर (धुळे)- जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन  दिवसांत झालेल्या जिल्हा परिषद शाळा बाळापूर (ता.धुळे) येथील सर्व समावेशक प्रशिक्षण व संसाधन केंद्रात मोफत निदान व उपचार शिबिरात 378 मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात धुळे तालुका 155 धुळे महानगरपालिका 91 शिंदखेडा 82 साक्री तालुका 62 शिरपुर तालुका 76  व इतर जिल्ह्यातील 33 याप्रमाणे 499 मुलांची नोंदणी करण्यात आली होती. यात 378 मुलांची मोफत तपासणी करण्यात आली. उर्वरीत मुलांना मोफत औषधे देण्यात आले.

समग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद धुळे व जय वकिल फाउंडेशन मुंबई, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था धुळे यांच्या सयुंक्त विद्यमाने बाळापूर (ता.धुळे) येथे प्रमस्तिष्क आजार असलेल्या मुलांचे शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण यांच्या मार्गदर्शनाखाली  घेण्यात आले. जसलोक व वाडिया हॉस्पिटल मुंबई येथील प्रसिद्ध पेड़ियाट्रिक नुरोलॉजिस्ट डॉ. अनैता हेगडे यांच्या मार्गदर्शनाख़ाली वैद्यकीय अधिकारीची तीस तज्ज्ञ डाॅक्टरांचे पथकाने धुळे जिल्ह्यातील मस्तिष्क आजार असलेले, मतिमंद, ऑटिजम, मेंदूचा पक्षा घात, फिट्स, नसाचा आजार, मुव्हमेंट डिस ऑडर, सेरेबल पाल्सी असणाऱ्या मुला मुलीवर मोफत निदान व तपासणी करण्यात आली आहे.

तपासणीचा तपशील-
ईईजी तपासणी- 17
वाचादोष- 94
फिजियोथेरेपी सेवा- 71
एम. आर.आय.- 04
बुद्धिगुणांक तपासणी- 27
एक्स रे- 16
ऑर्थोपेडिक साहित्य- 17
सी टी स्कॅन- 01

Web Title: 378 children check up in camp in Balapur