Budget 2023 : कुळथे मोघण धुळे रस्त्यासाठी अर्थसंकल्पात 4 कोटींची तरतूद

Funds News
Funds Newsesakal

कापडणे : रतनपुरा जिल्हा परिषद गटातील कुळथे-मोघण-धुळे या रस्त्यांसाठी राज्य अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद करण्यात आली. (4 crores were allocated in state budget for Kulthe Moghan road dhule news)

धुळे- मोहाडी-रानमळा-तिखी-मोघण कुलथे या प्रजिमा ५८ या रस्त्यासाठी निधीस मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती बोरकुंडच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांनी दिली. त्यांच्या पाठपुराव्यास यश आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला धुळे-मोघण-कुळथे प्रजिमा ५८ रस्त्याची नुकतीच दर्जोन्नती झाली आहे. रतनपुरा व बोरकुंड गटासह तालुक्यातील लोकांसाठी मोहाडी, रानमळा, तिखी, मोघणमार्गे असलेल्या धुळे ते कुलथे रस्ता महत्त्वापूर्ण ठरतो.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Funds News
Dhule News : साक्री तालुक्यासाठी 168 कोटी

या रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो. बोरकुंड गटाच्या सदस्या शालिनी भदाणे व रतनपुरा गटाच्या सदस्या अनिता पाटील आमदार मंजुळा गावित यांच्या माध्यमातून या कामासाठी पाठपुरावा करत होत्या.

आमदार गावित यांनी या संदर्भात सार्वजनिक विभागमंत्री रवींद्र चव्हाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यात बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांचा पाठपुरावा व आमदार गावित यांच्या प्रयत्नांना यश आले.

दरम्यान, बोरकुंड, रतनपुरासह बोरी पट्ट्यातील रस्ते व पुलांसाठी यापुढेही पक्षभेद विसरून, सर्वांच्या सहकार्याने विकासकामे करीत राहू, अशी प्रतिक्रिया इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व सदस्या शालिनी भदाणे यांनी दिली.

Funds News
Sahyadri Farms : दगडूशेठ गणपतीला येत्या संकष्टीला सह्याद्री फार्म्सतर्फे द्राक्षांची आरास!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com