सीईटीसाठी राज्यातून यंदा चार लाख अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयाच्या राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा विभागामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी, बी.टेक., डी.फार्म. या अभ्यासक्रमांच्या "एमएचटी-सीईटी-2017'साठी राज्यभरातून तीन लाख 97 हजार 784 विद्यार्थ्यांनी सोमवारी अखरेच्या दिवसापर्यंत अर्ज भरले. सीईटीसाठी 11 मे रोजी परीक्षा होणार आहे.

सीईटी 2017 परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 14 फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती. पहिल्या टप्प्यातच मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. मात्र, काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्यांनी विलंब शुल्कासह वाढीव मुदतीचा लाभ घेतला. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे छायाचित्र, सहीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करायची होती. त्यात काही तांत्रिक अडचण आलेल्या अर्जदारांना विभागातर्फे संपर्क करून अचूक छायाचित्र, सही पाठविण्याचे आवाहनदेखील केले होते.

महत्त्वाच्या तारखा
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख ------24 एप्रिल
सीईटी परीक्षेची तारीख ----------------11 मे
निकाल जाहीर करण्याची तारीख --------4 जूनपूर्वी

विभागनिहाय सीईटी
देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

नाशिक -------------46 हजार 200
पुणे ----------------92 हजार 911
मुंबई ---------------80 हजार 336

Web Title: 4 lakh form for cet exam