Nandurbar News : खासदार डॉ. हीना गावित यांच्या प्रयत्नांनी 4 रस्तेकामांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road development in nandurbar

Nandurbar News : खासदार डॉ. हीना गावित यांच्या प्रयत्नांनी 4 रस्तेकामांना मंजुरी

नंदुरबार : खासदार डॉ. हीना गावित (Heena Gavit) यांच्या प्रयत्नांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती करणे कामासाठी केंद्र सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली, तसेच राष्ट्रीय महामार्ग ७५३ बीच्या नंदुरबार ते तळोदा रस्ता चौपदरीकरणास लवकरच मंजुरी मिळणार आहे. (4 road works approved due to efforts of MP Dr Heena Gavit nandurbar news)

जिल्ह्यातील राष्ट्रीय मार्ग ७५३ बी (शेवाळी ते नेत्रंग)मधील नंदुरबार ते तळोदा लांबी ( साखळी क्र. किमी ४९/०५० ते ७८/४८२ चे काँक्रिट चौपदरीकरण करणे) एकूण लांबी २९.४३२ किमी रस्त्यासाठी मुख्य अभियंता, रा.मा.सा.बां. कोकण भवन, नवी मुंबई कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी सादर केले असून, लवकरच रस्ते मंत्रालय, नवी दिल्लीकडून मंजुरी मिळेल.

रा.म. ७५३ बीचे नवापूर चौफुली ते सी.बी. पेट्रोलपंप (साखळी क्र. किमी ४९/०० ते ५७/००)चे किरकोळ दुरुस्ती, लांबी- ८ किमी. हे काम येत्या दोन दिवसांत सुरू होईल. रा.म. ७५३ बीचे सुदर्शन पेट्रोलपंप ते वाका चार अंतुर्ली (सागली क्र. किमी ५८/६९/७००) किरकोळ फक्त करणे. ११.२०० किमी. हे काम २० ते २५ दिवसांत सुरू होणार आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

रा.म. १६० एचचे सारंगखेडा ते शहादा एकूण १४ किमीचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. निविदाप्रक्रिया प्रगतीत आहे. या राष्ट्रीय महामार्गांच्या वरील कामाबाबत डॉ. हीना गावित यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.