प्राप्तिकराच्या रडारवर 40 गर्भश्रीमंत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

नाशिक : नोटाबंदीदरम्यान अनेकांच्या बॅंक खात्यावर आलेल्या अवाढव्य रकमेचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी अखेर प्राप्तिकर विभागाने शहरातील 40 जणांना नोटिसा पाठविल्या असल्याचे समजते. यामध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांचा समावेश आहे. दरम्यान, बॅंक खात्यांवर एक कोटी व त्यापेक्षा जास्तीची रक्कम जमा झालेल्या सुमारे दीडशे खातेदारांची यादीच प्राप्तिकर विभागाने तयार केली असून, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे समजते. 

नोटाबंदीच्या आजच्या अखेरच्या दिवशीही बॅंकांमध्ये हजार-पाचशेच्या नोटा खात्यावर जमा करण्यासाठी गर्दी होती. पावणेदोन महिन्यांच्या काळात बॅंकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती प्राप्तिकर विभागालाही मिळालेली आहे. त्यानुसार शहरातील अनेकांच्या बॅंक खात्यावर सात कोटींपेक्षाही अधिकची रक्कम जमा झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक व ज्वेलर्स यांची सुमारे 150 जणांची यादी तयार केली आहे. यापैकी आज 40 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार, संबंधितांनी त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केलेल्या रकमेचा स्त्रोत प्राप्तिकर विभागाला द्यावावयाचा आहे. स्त्रोत न दिल्यास प्राप्तिकर विभागाकडून पुढील कारवाई केली जाण्याचीही शक्‍यता आहे. तसेच ही रक्कम बेहिशेबी ठरवून त्यानुसार कारवाई होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, ज्वेलर्सचे धाबे दणाणले आहेत. 

त्र्यंबकनंतर गोदातीर 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्‍वर येथील दोघा व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकून सलग 48 तास तपासणी मोहीम राबविली होती. त्यामुळे आधीच शहरातील व्यापारी, व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार होतीच. त्यातच आज प्राप्तिकर विभागाने 40 जणांना बॅंकेतील रकमेचा हिशेब सादर करण्याचे आदेश नोटिशीद्वारे बजावले आहेत.

Web Title: 40 accounts on radar of Income Tax Department