राजापूरसह ४१ गावांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात समावेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

राजापूरसह ४१ टंचाईग्रस्त गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता भुजबळ यांची मागणी होती.त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असल्यामुळे योजनेकरिता अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नाशिक यांनी दि ८ सप्टेंबर २०१७ रोजी शासनास पूर्व व्यवहार्यता अहवाल सादर केलेला होता.

येवला : राजापूरसह टंचाईग्रस्त ४१ गावांच्या नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे टंचाईग्रस्त गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागत आहे.

आज मुंबई येथे केंद्र शासनाचे पाणी पुरवठा सचिव व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल यांच्यात झालेल्या राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राजापूरसह ४१ टंचाईग्रस्त गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता भुजबळ यांची मागणी होती.त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असल्यामुळे योजनेकरिता अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नाशिक यांनी दि ८ सप्टेंबर २०१७ रोजी शासनास पूर्व व्यवहार्यता अहवाल सादर केलेला होता.

संपूर्ण तालुका टंकरमुक्त करण्यासाठी सदर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर नवीन ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याची भुजबळ यांची संकल्पना होती. या योजनेचा ग्रामीण पेयजल कार्यक्रमामध्ये समावेश करण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत होते. शासनाने या योजनेचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात समावेश केल्यामुळे सदर योजनेसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच सविस्तर अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता मिळण्याची कार्यवाही केली जाणार आहे. आणि प्रशासकीय मान्यतेनंतर या योजनेचे काम हाती घेतले जाणार आहे.

सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर,ममदापूर, रेंडाळे, अंगुलगांव,डोंगरगांव, देवदरी, खरवंडी, राहाडी,पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे,वाघाळे, आहेरवाडी, कोकणखुर्द,पाझरवाडी, जायदरे, हडपसावरगाव,वाईबोथी, खामगांव, देवठाण,गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण,कौटखेडे, आडसुरेगाव, धामनगांव,लहित, गोरखनगर, वसंतनगर,चांदगाव, कोळम बु,कोळगाव,कुसमाडी, नायगव्हाण, तळवाडे,खिर्डीसाठे, महालगाव, घनमाळी मळा (नगरसूल), गणेशपूर, कासरखेडे,दुगलगांव, बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. सदर गावांना शाश्वत नळ पाणीपुरवठा योजना मिळणार असून त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.निफाड तालुक्यात असलेल्या देवगाव,मानोरी,कोळगाव, मरळगोई खुर्द, खानगावथडी,पाचोरे खुर्द आणि टाकळी विंचूरसह ५वाड्या या गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचाही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे

Web Title: 41 villages include in water project Yeola