सटाणा बाजार समितीसाठी १४४ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सटाणा (नाशिक) : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच नव्या नियमानुसार होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतील १७ जागांसाठी १४४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वाधिक ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अजमेर सौंदाणे गणातून सर्वाधिक १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर पठावे दिगर व वीरगाव या गणांमधून प्रत्येकी दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वात कमी मतदार संख्या असलेल्या व्यापारी व हमाल - मापारी गणातूनही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीतील चुरस पहिल्या टप्प्यातच सिद्ध झाली आहे.

सटाणा (नाशिक) : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच नव्या नियमानुसार होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतील १७ जागांसाठी १४४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वाधिक ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अजमेर सौंदाणे गणातून सर्वाधिक १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर पठावे दिगर व वीरगाव या गणांमधून प्रत्येकी दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वात कमी मतदार संख्या असलेल्या व्यापारी व हमाल - मापारी गणातूनही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीतील चुरस पहिल्या टप्प्यातच सिद्ध झाली आहे.

आज सकाळी दहा वाजेपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गणनिहाय इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मुख्य निवडणूक कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. तहसील आवारातील वाहनांच्या गर्दीमुळे आवाराला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी कार्यालयात उभ्या असलेल्या शेवटच्या इच्छूकापर्यंतचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी स्वीकारले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत अहिरे, तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे संस्थापक संजय सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती शैलेश सूर्यवंशी, माजी सभापती अनिल चव्हाण, भिका सोनवणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते केशव मांडवडे, समकोचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे, संचालक किशोर गहीवड, श्री हरी ओम पतसंस्थेचे संस्थापक किशोर भांगडिया, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. अनिल पाटील, पंकज ठाकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी पवार, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष शिवाजी रौंदळ, सुनील निकम आदी मातब्बरांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

गणनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
लखमापूर (इतर मागास वर्ग) : अनिल चव्हाण, डॉ. विलास बच्छाव, शक्ती दळवी, संजय देवरे, सचिन बच्छाव, भाऊसाहेब बच्छाव, अनिल दळवी, केवळ दळवी, अशोक बच्छाव.

ब्राह्मणगाव (सर्वसाधारण) : नरेंद्र अहिरे, कैलास नामदेव अहिरे, किरण अहिरे, सुभाष पाटील, संदीप अहिरे, नरेंद्र अहिरे, यशवंत अहिरे, योगिता अहिरे, कैलास उखा अहिरे.

अजमेर सौंदाणे (सर्वसाधारण) : प्रकाश देवरे, सुमनबाई पाटील, दत्तू पवार, विजय पवार, गणपतसिंग मगर, राजेंद्र पवार, शिवाजी पवार, अतुल पवार, रमेश नंदाळे, बाबूलाल पवार, मंगेश पवार, नानाभाऊ पवार, किरण देवरे, जितेंद्र पवार, नारायण पवार.

आराई (अनुसूचित जाती जमाती) : समाधान अहिरे, दिलीप सोनवणे, अनिल खरे, वेनुबाई माळी, भिवसन गरुड.

सटाणा (सर्वसाधारण) : सुभाष सोनवणे, बाळकृष्ण देवरे, पांडुरंग सोनवणे, माधव सोनवणे, भिका सोनवणे, बाबाजी सोनवणे, अनिल सोनवणे, राहुल सोनवणे, प्रल्हाद पाटील, भरत अहिरे, मनोहर देवरे, मंगला सोनवणे.

ठेंगोडा (विमुक्त जाती / भटक्या जमाती) : आनंदा भोई, सरदारसिंग जाधव, दीपक नंदाळे, जिभाऊ मोरकर, दिनेश मोरकर, निंबा वानले.

मुंजवाड (सर्वसाधारण) : प्रभाकर रौंदळ, शैलेश सूर्यवंशी, दीपक ठोके, प्रकाश निकम, भास्कर जाधव, राजू सोनवणे, गणेश जाधव.

खमताणे (महिला राखीव) : स्वाती गुंजाळ, शोभाबाई अहिरे, शैला गुंजाळ, चंद्रभागाबाई इंगळे, जिजाबाई इंगळे, रत्नमाला सूर्यवंशी.

डांगसौंदाणे (सर्वसाधारण) : संजय सोनवणे, रवींद्र सोनवणे, कैलास बोरसे, सुशीलकुमार सोनवणे.

कंधाणे (सर्वसाधारण) : सुभाष सावकार, अनिल पाटील, संजय बिरारी, राकेश मोरे, संजय बिरारी.

पठावे दिगर (सर्वसाधारण) : तुकाराम देशमुख, मधुकर ठाकरे.

तळवाडे दिगर (सर्वसाधारण) : पंकज ठाकरे, बाजीराव अहिरे.

वीरगाव (महिला राखीव) : सुनिता देवरे, विमल देवरे.

चौगाव (सर्वसाधारण) : अनिल सोनवणे, केशव मांडवडे, राजेंद्र जगताप, शिवाजी रौंदळ, राजेंद्र जाधव, सुनील निकम, दिलीप पाटील.

वायगाव (सर्वसाधारण) : कैलास सोळंके, कल्याणसिंग वाघ, मच्छिंद्र अहिरे, नथू अहिरे, राजेंद्र सोनवणे, मधुकर देवरे, समाधान अहिरे.

हमाल - मापारी मतदार संघ : संदीप साळे, रमेश सोनवणे, पोपट सोनवणे, दीपक गांगुर्डे, राहुल देसले, बाजीराव सोनवणे, भगवान भारती, रमेश मोरे, समाधान भदाणे.

आडते / व्यापारी मतदार संघ : जयप्रकाश सोनवणे, किशोर गहिवड, श्रीधर कोठावदे, महेश कोठावदे, किशोर भांगडिया, अशोक बडजाते, रवींद्र सोनवणे.

Web Title: 44 nomination papers for Satana Bazar Samiti