नाशिक - जिल्ह्यात 4400 घरकुले रखडली

भाऊसाहेब गोसावी
बुधवार, 20 जून 2018

निमोण (नाशिक) : अपूऱ्या निधीमूळे जिल्ह्यात साडेतीन हजार गरीबांच्या स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे अशी शासनाचे धोरण निश्चित आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मंजूर घरापैकी चार हजार चारशे घरे अद्यापही अपूर्ण आहेत . घरासाठी मंजूर रकमेत घर पूर्ण होत नाही. काही लाभार्थ्यांनी पूर्ण केले ते आवश्यक असलेली रक्कम हात उसनवारी किंवा कर्ज काढून इतक्या मोठ्या संख्येने घरकुले अपूर्ण असल्याने जिल्हा यंत्रणेला अभ्यास करण्याची गरज आहे.

निमोण (नाशिक) : अपूऱ्या निधीमूळे जिल्ह्यात साडेतीन हजार गरीबांच्या स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे अशी शासनाचे धोरण निश्चित आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मंजूर घरापैकी चार हजार चारशे घरे अद्यापही अपूर्ण आहेत . घरासाठी मंजूर रकमेत घर पूर्ण होत नाही. काही लाभार्थ्यांनी पूर्ण केले ते आवश्यक असलेली रक्कम हात उसनवारी किंवा कर्ज काढून इतक्या मोठ्या संख्येने घरकुले अपूर्ण असल्याने जिल्हा यंत्रणेला अभ्यास करण्याची गरज आहे. एकीकडे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व आदिवासी आपल्याला घरकुल मिळावे यासाठी ग्रामपंचायती पासून इतर सर्वच सरकारी कार्यालयात चकरा मारताना दिसतात. दुसरीकडे ज्यांना घरकुल मंजूर आहे त्यांची अपूर्ण आहेत.

पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या अंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधकाम करण्यासाठी एक लाख विस हजार रुपये व मजूरी साठी अठरा हजार रुपये असे एकुण एक लाख अडोतीस हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतात. या रकमेत लाभार्थ्यांने दोनशे सत्तर चौरस फूटाचे पक्के घराचे बांधकाम करणे अपेक्षित असते. यामध्ये स्वयंपाक घर, शौचालय आदी सुविधा असाव्यात. प्रत्यक्षात मात्र अशा पद्धतीने  घराचे बांधकाम करण्यासाठी दिड ते दोन लाख रुपये लागतात. याच कारणामुळे अनेकांची घरे अपूर्ण राहतात.काही लाभार्थ्यांनी स्वतः काही रक्कम उभी करून आपले स्वप्न पुर्णत्वास नेले आहे. तर काहींनी मिळालेली रक्कम देखील मौज मजेत खर्च केली हेही वास्तव आहे. 

पूर्ण घरकुल पैकी अनेक घरे प्लास्टर विना आहेत. बहुतांश घरे फरशी, रंग न देताच वापरात आहेत. कित्येक घरकुलांमध्ये अद्यापही विजजोडणी नाही. अनेक घरात गॅस कनेक्शन अभावी चूलीचा धूर च दिसतो आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आवास योजनेत अनुदानित रक्कम वाढवून नव्याने बदल करावयास हवा.

या योजनांच्या यशस्वी ते साठी शासकीय यंत्रणा खरोखरच खूप काम करताना दिसते यासाठी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामसेवक, स्थापत्य अभियंते, सत्तेचाळीस ग्रामीण अभियंते, पंधरा डाटा एंट्री आँपरेटर, एक प्रोगामर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली काम करत आहे.
या यंत्रणे मार्फत लाभार्थ्यांचे वास्तवात प्रबोधन गरजेचं आहे.

घरकुलांमध्ये महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लक्षांक आहे. तरी देखील घरकूलांच्या बांधकामात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तर देशात एकशे सहाव्या क्रमांकावर आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी यंत्रणा पहाटे चार वाजेपासून कामाला सुरुवात करते.याचे फलीत म्हणून गेल्या तिन महीन्यात घरकुल बांधकाम पूर्ण होण्यास गती मिळाली आहे.

विविध टप्प्यात मिळते लाभार्थ्यांना रक्कम
अग्रीम - पंचवीस हजार रुपये
पाया खोदकाम झाल्यावर - तिस हजार रुपये
पत्रा लेव्हल बांधकाम झाल्यावर - तिस हजार रुपये
पूर्ण झाल्यावर - पस्तीस हजार रुपये
तर मजूरीचे अठरा हजार रुपये 
अशा पद्धतीने मिळतात.

सन. २०१६ - १७ 
एकूण मंजूर घरे -   १९४१८
पूर्ण घरे.-  १७२०१ 
अपूर्ण घरे.- २२१७
सन.२०१७ - १८ 
एकूण मंजूर घरे.-  २३२३
पूर्ण घरे.- ९०
अपूर्ण घरे.-  २२३१
दोन वर्षात एकूण अपूर्ण  ४४४८

सध्याच्या महागाई चा विचार करता घरकुलांसाठी च्या रकमेत घराचे बांधकाम पूर्ण होत नाही. घरकुलाच्या अनुदानात वाढ करावी.
- पंकज दखणे, माजी सरपंच निमोण ता.चांदवड

लाभार्थी कामा निमित्ताने स्थलांतरित होतात त्यामुळे कामाला उशीर होतो. आमची संपूर्ण यंत्रणा लाभार्थ्यांस सर्वोतोपरी मदत करत आहे. लवकरच सर्व घरे पूर्ण होतील.
- प्रमोद पवार, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

Web Title: 4400 homes on delay in nashik