राज्यातील 50 तरुणांना 45 हजारांची छात्रवृत्ती

Scholarship
Scholarship

नाशिक - राज्यातील विकास प्रक्रिया व टप्पे जाणून घेत सरकारी यंत्रणेचे कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा म्हणून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यातंर्गत 2019-20 मध्ये 50 तरुणांना संधी मिळणार असून, त्यात एकतृतीयांश तरुणी असतील. प्रत्येकाला दरमहा 40 हजारांचे मानधन आणि पाच हजार प्रवासखर्च अशी 45 हजारांची रक्कम छात्रवृत्ती स्वरूपात मिळतील.

कोणत्याही शाखेतील पदवीधराला छात्रवृत्तीची संधी मिळणार आहे. त्यासाठी किमान साठ टक्के गुण आवश्‍यक असतील. उच्चत्तम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य राहील. पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक 1 जून 2019 पूर्वीचे अपेक्षित असेल. किमान एक वर्षाचा अनुभव आवश्‍यक असेल. यासाठी ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेची कार्यपद्धती mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन परीक्षा होईल. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना विशिष्ट कालावधीत दिलेल्या विषयांवरील निबंध ऑनलाइन सादर करावे लागतील. वस्तुनिष्ठ चाचणीत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दीडशे उमेदवारांच्या मुलाखती मुंबईत होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com