जिल्हा परिषदेच्या 47 शिक्षकांना बारा वर्षांनंतर मिळाला न्याय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

चोपडा - राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याने प्रलंबित वेतनश्रेणीचा जिल्हा परिषदेच्या तालुक्‍यातील 47 शिक्षकांना लाभ मिळाला आहे. तब्बल बारा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना न्याय मिळाला आहे. 

#शिक्षकभरती

चोपडा - राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याने प्रलंबित वेतनश्रेणीचा जिल्हा परिषदेच्या तालुक्‍यातील 47 शिक्षकांना लाभ मिळाला आहे. तब्बल बारा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना न्याय मिळाला आहे. 

#शिक्षकभरती

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या 47 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यास विलंब होत होता. तब्बल दोन ते तीन वर्षांपासून वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यास पात्र असूनही वेतनश्रेणी मिळत नव्हती. यावर या शिक्षकांची बाजू घेत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर यावर प्रशासनाने निर्णय घेऊन 14 मेस वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याची कार्यवाही व्हावी, असे आदेश दिले आहेत. 

तालुक्‍यात प्राथमिक शिक्षकांनी सलग बारा वर्षे नियमित वेतनश्रेणीत काम केले असूनही त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यासाठी विलंब होत होता. याबाबत चोपडा गटात कार्यरत असलेल्या शिक्षकांनी व संघटनेने आवाज उठविला होता. यावर प्रशासनाने स्वतंत्र 14 मेस आदेश काढून वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यात शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेतील सर्व नोंदी तपासून, गोपनीय अहवाल, सेवांतर्गत प्रशिक्षण, शैक्षणिक अर्हता यांबाबत सर्व बाबी पडताळून वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे. यामुळे शिक्षकांच्या वेतनात 3500 ते 3600 रुपयांची वाढ होणार आहे. 

या शिक्षकांचा आहे समावेश 
योगेश पाटील, समाधान बाविस्कर, योगिता बाविस्कर, छाया सपकाळे, रेखा पाटील, भोलाराम वळवी, कल्पना पाटील, पंडित पाळवी, शेख असगर अब्दुल अजीज, प्रतिमा गावित, अमित डुडवे, नंदिनी पवार, डिगंबर पाटील, आशा चांदसरे यांच्यासह 47 शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. याकामी गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, गटशिक्षणाधिकारी जी. सी. ठाकरे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे, तालुकाध्यक्ष प्रदीप बोरसे, त्रिशूळ पाटील, गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

Web Title: 47 teachers of Zilla Parishad got justice after 12 years