शेतकऱ्यांच्या 97 आत्महत्यांपैकी 49 प्रकरणे मदतीला अपात्र 

शेतकऱ्यांच्या 97 आत्महत्यांपैकी 49 प्रकरणे मदतीला अपात्र 

नाशिक - जिल्ह्यात गत अकरा महिन्यांत तब्बल 97 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या 97 आत्महत्यांपैकी तहसीलदारांच्या अहवालानुसार 26 आत्महत्या पात्र, तर 49 प्रकरणी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. याशिवाय 22 प्रकरणे प्रलंबित आहेत. 

बागलाण, दिंडोरी, मालेगाव व निफाड या तालुक्‍यांमधूनच 62 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याने दुष्काळाची दाहकता लक्षात येते. शेतकरी आत्महत्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे जानेवारी ते 26 नोव्हेंबर या काळात दाखल गोषवाऱ्यानुसार बागलाण, दिंडोरी व मालेगाव तालुक्‍यातील तब्बल 16 शेतकऱ्यांनी, तर निफाड तालुक्‍यातील 14 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. या 97 आत्महत्यांपैकी तहसीलदारांच्या अहवालानुसार 26 आत्महत्या पात्र, तर 49 प्रकरणी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. याशिवाय 22 प्रकरणे प्रलंबित आहेत. 

क्रम तालुका पात्र अपात्र प्रलंबित एकूण 
1) नाशिक 00 04 00 04 
2) बागलाण 03 09 04 16 
3) चांदवड 01 02 00 03 
4) सिन्नर 00 07 01 08 
5) देवळा 03 00 00 03 
6) दिंडोरी 06 04 06 16 
7) इगतपुरी 00 01 00 01 
8) कळवण 00 00 01 01 
9) मालेगाव 04 08 04 16 
10) नांदगाव 02 05 02 09 
11) निफाड 04 06 04 14 
12) त्र्यंबकेश्‍वर 01 02 00 03 
13) येवला 02 01 00 03 
14) पेठ 00 00 00 00 
15) सुरगाणा 00 00 00 00 
--------------------------------------------------------------- 
एकूण 26 49 22 97 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com