उदमांजराची शिकार केल्याने पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अंबासन (जि. नाशिक) - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील वनपरिक्षेत्रांतर्गत साल्हेर वन परिमंडळात मानूर नियतक्षेत्रात उदमांजराची शिकार करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संशयिताना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी दिली आहे. बागलाण तालुक्‍यातील जंगलात वणवा पेटण्याचे सत्र सुरू आहे. याचा शोध घेत असताना ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना साल्हेर वनपरिमंडळातील मानूर येथील जंगलात मंगळवारी (ता. 24) धूर निघत असल्याचे दिसल्याने कर्मचारी त्या दिशेने गेले. त्या वेळी काही लोक धुराडे करून वन्यजीव उदमांजरची शिकार करीत असल्याचे निदर्शनास आले.
Web Title: 5 arrested in wild cat hunting