जळगावजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 5 ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

या अपघातात बंडू वाणी यांच्यासह त्यांच्या परिवाराचे चार सदस्य जागेवर ठार झाले आहेत. तर अन्य चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे इथे हलविण्यात आले आहे.

जळगाव : धुळे येथून लग्नसमारंभ आटोपून पाचोरा येथे घरी परतत असताना झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत.

पाचोरा येथील दत्त कॉलोनीतील रहिवाशी असलेल्या अलहित परिवार शुक्रवारी (ता.11) भाचिच्या लग्नासाठी धुळे येथे गेले होते. भाचीचे लग्न आटोपून धुळे येथून मारुती इको गाडी (क्र. एमएच १९ सीयू ३९८०) ने पाचोऱ्याकडे येत होते. आज (शनिवार) पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या गाडीला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर दळवेल गावाजवळ ट्रकला समोरुन जबरदस्त धडक दिली.

या अपघातात बंडू वाणी यांच्यासह त्यांच्या परिवाराचे चार सदस्य जागेवर ठार झाले आहेत. तर अन्य चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे इथे हलविण्यात आले आहे.

Web Title: 5 dead in accident near Jalgaon