नाशिक पोलिस आयुक्तालयातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिस दलातील अधिकार-कर्मचाऱ्यांसाठीचे "राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले. यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्लेखनीय कामगिरीचा "राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले आहे. तर, नाशिक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तिघे आणि राज्य गुप्तचर विभागाच्या नाशिक कार्यालयातील एकास पोलीस दलातील प्रशंसनीय कामगिरीबद्दलचे "पोलीस पदक' जाहीर झाले आहे. 

पोलीस दलासाठी सर्वोच्च सन्मान समजला जाणाऱ्या राष्ट्रपती पदकाने सन्मानित होणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती पदकांच्या उल्लेखनीय गटामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना "राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले आहे. 
तर, पोलीस दलामध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या "पोलीस पदक' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण संपत आहिरे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाना जाधव, परिमंडळ दोनचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ खान दौडखान पठाण, तर राज्य गुप्तचर विभागाच्या नाशिक कार्यालयातील नानाकुमार सुरेशप्रसाद मिसर यांना जाहीर झाले आहेत.

Web Title: 5 police from nashil police commissioner office entitled for President's Police Medal