Dhule Crime News : बालिकेवर लैंगिक अत्याचार साक्री तालुक्यातील 5 संशयितांना अटक | 5 suspects arrested in Sakri taluka for sexually assaulting a girl Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Arrested News

Dhule Crime News : बालिकेवर लैंगिक अत्याचार साक्री तालुक्यातील 5 संशयितांना अटक

Dhule News : भोनगाव (ता. साक्री) शिवारात संतापजनक घटना घडली आहे. मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या बालिकेला उचलून नेत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला, तर त्यास तिघांनी सहाय्य केले.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित पाच जणांना अटक केली आहे. (5 suspects arrested in Sakri taluka for sexually assaulting a girl Dhule News)

भोनगाव येथील पीडित मुलीच्या आजीने साक्री पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार १३ वर्षाची मुलगी तीन जूनला मध्यरात्री एकच्या सुमारास लघुशंकेसाठी उठली.

तेव्हा किशोर पंडित सूर्यवंशी याने तिचे तोंड दाबून तिला छोटू ऊर्फ प्रशांत रतीलाल बागूल, चेतन भटू बागूल, संदेश रामदास साबळे (सर्व रा. सावरपाडा, ता. साक्री) या तिघांनी उचलून नेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फिर्यादीच्या शेतालगत असलेल्या गोविंदा सुका गायकवाड यांच्या शेतातील विहिरीजवळील लिंबाच्या झाडाखाली बालिकेला नेले. तेथे छोटू ऊर्फ प्रशांत बागूल व चेतन बागूल या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तेव्हा बालिका आरडाओरड करीत असताना जयेश नेहरू सूर्यवंशी (रा. सावरपाडा) हा घटनास्थळी आला. त्याने अत्याचाराची घटना पाहूनही संशयितांना कोणताही मज्जाव न करता तो तेथून निघून गेला. याप्रकरणी संशयित पाच जणांवर विविध कलमांसह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.