Loksabha 2019 : रामटेक मतदारसंघात ५० लाख रुपये जप्त

Money
Money

नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ५० लाख रुपयांची रोकड प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतली. या विभागाने आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत २ कोटी १० लाखांची रोकड हस्तगत केली आहे. 

निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असल्याचे आढळल्यास प्राप्तिकर विभागाला कळवा, त्याची त्वरित दखल घेऊन कारवाई केली जाईल. अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या नाशिक विभागाचे प्रमुख निर्देशक जयराज काजला यांनी दिली. जप्त केलेली रोकड कुणाकडे सापडली याविषयीची माहिती दिली नाही. निवडणूक आयोग सांगेल त्याप्रमाणेच कारवाई होत असल्याने त्याविषयी आवश्‍यक तेवढीच माहिती दिल्याचे ते म्हणाले. आयोगाने निवडणुकीतील काळ्या पैशाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 

माहितीविषयी मौन 
बीड मतदार संघात यापूर्वी १ कोटी ९० लाखांची रोकड जप्त केली. आज रामटेक मतदारसंघात ५० लाखांची रोकड मिळाली. प्राप्तीकर विभागाने जप्त केलेली रोकडविषयी व ती कुणाकडे सापडली याविषयी जास्त माहिती काजला यांनी दिली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com