कांदा व्यापाऱ्यांचे अडकले ५०० कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नाशिक - पाचशे-हजाराच्या नोटा बंदच्या वातावरणात चलन उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनल्याने कांदा व्यापाऱ्यांचे पाचशे कोटी रुपये अडकून पडले आहेत. तसेच गुरुवारपासून (ता. १७) पिंपळगाव बसवंत आणि शुक्रवारपासून (ता. १८) लासलगावमध्ये सुरू होणाऱ्या लिलावावेळी शेतकऱ्यांना बॅंक खात्याची झेरॉक्‍स प्रत सोबत ठेवावी लागणार आहे.

सुट्या पैशाअभावी कांद्याचे लिलाव करता येत नाहीत असे वातावरण जिल्हाभर तयार झाले. काही बाजार समित्यांमधून पैसे उपलब्ध होतील तसे लिलाव सुरू ठेवण्यात आले. शेतकरी रोख पैसे मागत असल्याने त्यांना पैसे द्यायचे कोठून? असा प्रश्‍न तयार झाला. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी धनादेश स्वीकारावेत अथवा बॅंक खात्यात पैसे जमा करता येतील असा प्रस्ताव दिला. त्यास बाजार समित्यांनी अनुकुलता दर्शवली आहे. आयएफएससी सह खाते क्रमांक असलेली झेरॉक्‍स प्रत शेतकऱ्यांनी लिलावापूर्वी दाखवावी, असे निवेदन बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.

Web Title: 500 crore onion stuck traders