समाज दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळा केली डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

खामखेडा (नाशिक) : आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने समाजातील इतरांसाठी काही तरी केले पाहिजे. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. यात युवकांचा पुढाकार महत्वाचा असून आणि हे आदर्श काम लोहोणेरच्या जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी करत आहे. त्यांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा, असे प्रतिपादन मविप्र कार्यकारी मंडळाचे तालुका संचालक विश्राम निकम यांनी केले.

जनता विद्यालय, लोहोणेर येथे समाज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन  ते बोलत होते. समाज दिनाचे औचित्य साधत मार्च ९९ च्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून एक वर्ग डिजिटल करून दिला. डिजिटल युनिट डॉ विश्राम निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी लोहोणेरच्या सरपंच जयवंताताई बच्छाव, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख,गोविंद बागुल, डॉ.सुभाष आहेर, डॉ.रविंद्र शेवाळे, किशोर देशमुख, दिपक देशमुख,माणिक शेवाळे, केशव सोनवणे, जितु पाटील, कैलास निकम, सुनिल सोनवणे, नंदकिशोर चौधरी, ज्ञानेश्वर नेरकर आदि मान्यवरांसह विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एच भदाणे, पर्यवेक्षक एस जे उफाडे प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय दुखवट्यामुळे कर्मवीरांना लोहणेर शाळेत अत्यंत साध्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्यावतीने राकेश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत पवार यांनी केले. कल्पना धामणे यांनी आभार मानले
 
Web Title: 55/5000 Samāja dinānimitta mājī vidyārthyānnī śāḷā kēlī ḍijiṭala Former students have created digital school by day