उत्तर महाराष्ट्रात 565 कोटी महसूल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

नाशिक - उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत आर्थिक वर्षात 565 कोटींची महसूल वसुली झाली आहे. विभागाला 541 कोटी 16 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी नगर आणि जळगाव या प्रमुख दोन जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती न होताही नाशिक जिल्ह्यातील वसुलीमुळे विभागाचे 104 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 

राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर करमणूक कर वसुलीचे कामकाज स्थानिक स्वराज्य संस्थाकडे गेले. तसेच पर्यावरण दाखला असल्याशिवाय वाळू उपशांना परवानगी न देण्याच्या धोरणामुळे वाळू लिलावाला प्रतिसाद नाही. त्याचा महसूल वसुलीवर परिणाम झाला. मात्र, त्यानंतरही नाशिक जिल्ह्यात 38 कोटी इतकी घसघशीत वसुली झाल्याने विभागाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात मदत झाली. 

जिल्हा उद्दिष्ट एकूण वसुली टक्के 
नाशिक 175.42 कोटी 213.14 121 
धुळे 55.75 कोटी 56.90 102 
नंदुरबार 44.04 कोटी 45.79 103 
जळगाव 132.18 कोटी 128.86 97 
नगर 133.75 कोटी 120.70 90 
541.16 कोटी 565.42 104 

Web Title: 565 crore revenue in North Maharashtra