नाशिक - बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

अंबासन (नाशिक) : करंजाड येथील देवबा त्र्यंबक देवरे यांच्या ताहाराबाद रस्त्यावरील द्वारकाधीश शिवारातील शेतातील सहा शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली. यामुळे शेतकर्यांचे तीस हजारांच्या आसपास नुकसान झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून करंजाडी, काटवन व मोसम परिसरात बिबट्याची दहशत कायम असून शेतातील वस्ती करून राहणारे शेतकरी धास्तावले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे ठार झाली आहेत. वनविभागाकडून फक्त पंचनामा करून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत.

करंजाड येथील देवबा देवरे यांच्या ताहाराबाद रस्त्यावरील द्वारकाधीश शिवारातील शेतात काही शेळ्या बांधलेल्या होत्या पहाटेच्या सुमारास बिबट्याने तब्बल सहा शेळ्यांवर हल्ला चढवत ठार केले. सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे व पोलिस पाटिल प्रवीण देवरे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत. वनविभागाच्या आधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी केला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरामात येऊन पंचनामा केला. या परिसरात बिबट्याची दहशत वाढतच असून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाच्या आधिकाऱ्यांना नेहमीच विनवणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड सुरू आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जाते. अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च वृक्षलागवड केल्याचा आव वनविभागाकडून केला जातोय. मात्र जे डेरेदार मोठे-छोटे वृक्ष आहेत त्याचे संवर्धन होत नसल्याने सर्रासपणे अवैध वृक्षतोड केली जाते. यामुळे जंगल बोडकी होत असल्याने जंगली श्वापदे नागरी वस्तीकडे स्थलांतरित होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: 6 goats dies in leopards attack