पॉस यंत्राद्वारे सहा लाख १७ हजार टन खतवाटप

पॉस यंत्राद्वारे सहा लाख १७ हजार टन खतवाटप

नाशिक - रासायनिक खत वितरणातील गैरव्यवहार संपविण्यासाठी शासनाने ई-पॉस मशिनद्वारे खतवाटप केले. त्याअंतर्गत जिल्ह्यात वर्षात ई-पॉस मशिनद्वारे सहा लाख १७ हजार ३४९ टन खत थेट शेतकऱ्यांना देण्यात आले. 

खतावरील अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याच्या योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते नाशिक तालुका संघासह चांगली कामगिरी केलेले खत विक्रेते, ई-पॉस मशिन तंत्रज्ञांचा सत्कार झाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी डी. जे. देवरे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जे. आर. पाटील आदी उपस्थित होते.

‘कृष्णा’ जिल्ह्याचे मॉडेल
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील प्रयोगावरून राज्यात प्रायोगिक स्वरूपात हा उपक्रम राबविला गेला. २४ जून २०१६ ला नाशिकची प्रायोगिक जिल्हा म्हणून निवड झाली. जिल्ह्यात एक हजार ३२८ ई-पॉस यंत्रांद्वरे १५ डिसेंबर २०१६ पासून दीड महिना ३५ प्रशिक्षणांद्वारे सराव घेतल्यानंतर २ फेब्रुवारी २०१७ पासून ही प्रणाली अस्तित्वात आली. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१७ पासून हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. जिल्ह्यात ३१ ऑक्‍टोबरपर्यंत सहा लाख १७ हजार ३४९ टन खत ई-पॉस यंत्राद्वारे वितरित करण्यात आले. 

तालुकानिहाय पॉस मशिन
नाशिक १११, सिन्नर १०७, देवळा ६९, कळवण ६५, चांदवड ९०, निफाड १८१, इगतपुरी ७६, मालेगाव १३४, सटाणा ७५, सुरगाणा १, पेठ ७, दिंडोरी १४१, त्र्यंबकेश्‍वर १५, येवला १३५, नांदगाव १८५, जिल्हास्तरावर २३ एकूण १,३२८.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com