नाशिकमध्ये सात क्विंटल गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिक - दोन राज्यांच्या सीमा आणि महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा अडथळा पार करीत सुमारे सात क्विंटल गांजासह नाशिकमध्ये दाखल झालेला ट्रक नाशिकच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तपोवन चौकात पकडला. ट्रकचालकाने पोलिसांना चकविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु दोन दिवसांपासून मागावर असलेल्या पोलिसांनी ट्रक तपोवनात दाखल होताच ताब्यात घेतला. सुमारे 34 लाखांचा गांजा व ट्रक पोलिसांनी जप्त केला. हा गांजा घेणाऱ्याची पोलिस चौकशी करीत आहेत. यतीन अशोक शिंदे (वय 35), सुनील नामदेव शिंदे (वय 47) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Web Title: 7 quintal ganja seized in nashik crime