आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन खून

akkalkuva
akkalkuva

वाण्याविहिर (नंदूरबार) : अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथील आठ वर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार करून खून केल्याची घटना काल रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान आज सकाळी शेकडो जनसामान्यांनी अक्कलकुवा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा नेला.

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे काल (ता .22) रात्री आरोपी कमलसिंग करतारसिंग सिकलीकर  (रा.सोरापाडा, वय 30) याने एका आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केला. सदर बालिका संध्याकाळी चारपासून घरातून बेपत्ता होती. तिच्यावर रात्री आठच्या सुमारास बलात्कार करुन बालिकेच्या तोंडात कागदाचा गोळा कोंबुन तोंड बांधून आरोपीने हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली. पीडीत बालिकेचे आई वडील उत्तरप्रदेशचे असुन सुमारे सात वर्षापासुन मजूरीसाठी अक्कलकुवा येथे वास्तव्यास  होते. पीडीतीचे पालक जादूनाथ रामसिंग कुशवाहा (वय 36) यांनी घटनेची फिर्याद अक्कलकुवा पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार आरोपी कमलसिंग सिकलीकर याच्यावर भा.द.वि.कलम 302, 376 (2) (I), 376 (अ), 363, 201 व लैंगिक अत्याचारपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास अक्कलकुवा पोलिस अधिक्षक एम.डी.डांगे व पोलिस कर्मचारी तपास करीत आहे.

दरम्यान घटनेच्या दूसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपासुन घटनास्थळापासुन शेकडो संतंप्त नागरीकांनी तहसिल कार्यालयावर धडक निषेध मोर्चा काढून मोर्चेकऱ्यानी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; यासाठी ठाण मांडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com