सकाळचा दणका  "रम, रमीत रंगली मैफल'  ; नगरसेवक कुलभूषण पाटलांसह 9 संशयितांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

दैनिक सकाळ मध्ये 24 एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत चौकशी करण्यात आली. यासर्व प्रक्रियेत 21 दिवसांचा कालावधी लोटला गेला. दरम्यानच्या काळात पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आर.के.वाईन प्रकरणात पोलिस निरीक्षक यांच्यासह 3 पोलिस कर्मचाऱ्यावर केलेली कठोर कारवाई, मालेगाव प्रकरणातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन एकाची बडतर्फी झाल्यानंतरही वाळूमाफियाच्या पार्टिवर काहीच कारवाई होत नाही म्हणून सोशल मिडीयावर दोन दिवस झाले..त्या पार्टीचे काय? असा ट्रेन्ड सुरू होता. राजकीय दबावामुळे कारवाई होणार नाहीच अशा चर्चा असताना मध्यरात्री जामनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,सहभागी पोलिस कर्मचाऱ्यावर खातेअंतर्गत काय कारवाई होते याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे. 

जळगाव,  : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन असताना राजकीय वरदहस्त असलेल्या जळगावच्या काही वाळूमाफिया आणि पोलिसाने सोबत "रम,रमी ची रंगेल पार्टी, चे आयोजन केले होते. सर्वत्र लॉकडाऊनचे कडक पालन होत असतानाच एप्रिल महिन्यात (ता.21) रोजी ही पार्टी झाल्यानंतर व्हॉटस्‌-ऍपवर त्याचे फोटो व्हायरल झाले होते. पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देत तब्बल 21 दिवसानंतर या प्रकरणी मध्यरात्री जामनेर पोलिसांत भाजप नगरसेवकासह पोलिस कर्मचारी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

देशभर 21 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेले होते. शहरात जन-सामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलिस सर्वत्र चौका-चौकात सामान्य नागरिकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करून तसेच दंडूक्‍याचा प्रसाद वाटत होते. नागरी वस्त्यांमध्ये कमांडो पथके तैनात करण्यात येऊन मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च अशा कुठल्याच धार्मिक स्थळावर एकत्र येण्यास कायद्याने मनाई करण्यात आली असताना जळगाव शहरातील भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील, पोलिस कर्मचारी विनोद चौधरी(मुख्यालय)वाळूमाफिर्यांसह मोहाडी(ता.जामनेर) येथे जोरदार पार्टी केली होती. दारू, मटनावर ताव मारत जुगार खेळण्याचे फोटो व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर व्हायरल झाल्यावर या प्रकरणी सकाळने (ता.24)वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक बळिराम हिरे चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अहवाल अधीक्षकांना प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी जामनेर पोलिसांत काल मध्यरात्री (00:41)नऊ संशयितांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

यांच्यावर गुन्हा दाखल 
भारतीय दंड विधानाच्या कलम-269,188, साथरोग नियंत्रण अधिनियम-1897(3), आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत पोलिस नाईक अरंविद भोजू पाटील यांच्या तक्रारीवरून विठ्ठल भागवत पाटील(वय-33,रा.अयोध्यानगर), सुपडू मकडू सोनवणे(वय-46,रा.धरणगाव), बाळू नामदेव चाटे(वय-45रा.रामेश्‍वर कॉलनी), भाजपा नगरसेवक कुलभूषण विरभान पाटील(वय-32,पिंप्राळा), शुभम कैलास सोनवणे(वय-24,मयूर कॉलनी पिंप्राळा),अबुलैस आफताब मिर्झा(वय-32,रा.सालारनगर), हर्षल जयदेव मावळे(वय-31,रा.अयोध्यानगर), दत्तात्रय दिनकर पाटील(वय-32,मोहाडी), पोलिस कर्मचारी विनोद संतोष चौधरी (मुख्यालय) अशा नऊ संशयितांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

कारवाईला विलंबामुळे चर्चा 
दैनिक सकाळ मध्ये 24 एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत चौकशी करण्यात आली. यासर्व प्रक्रियेत 21 दिवसांचा कालावधी लोटला गेला. दरम्यानच्या काळात पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आर.के.वाईन प्रकरणात पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव, यांच्यावर केलेली कठोर कारवाई, मालेगाव प्रकरणातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन एकाची बडतर्फी झाल्यानंतरही वाळूमाफियाच्या पार्टिवर काहीच कारवाई होत नाही म्हणून सोशल मिडीयावर दोन दिवस झाले..त्या पार्टीचे काय? असा ट्रेन्ड सुरू होता. राजकीय दबावामुळे कारवाई होणार नाहीच अशा चर्चा असताना मध्यरात्री जामनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,सहभागी पोलिस कर्मचाऱ्यावर खातेअंतर्गत काय कारवाई होते याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 suspects including corporator Kulbhushan Patil charged in 'Rum, Ramit Rangali concert'