खावटीपोटी पतीने दिली साडेनऊ हजारांची चिल्लर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

दिवाणी व फौजदारी न्यायालयात एका पक्षकाराने पत्नीला द्यावयाच्या पोटगीची रक्कम नाण्यांच्या स्वरूपात आणली. साडेनऊ हजारांची ही रक्कम होती. पत्नीने संमती दिल्यानंतर चिल्लर मोजण्यास दुपारी प्रारंभ झाला. चिल्लर मोजण्याचे काम बराच वेळ सुरू होते. न्यायालयात हा चर्चेचा विषय झाला.

नाशिक - दिवाणी व फौजदारी न्यायालयात एका पक्षकाराने पत्नीला द्यावयाच्या पोटगीची रक्कम नाण्यांच्या स्वरूपात आणली. साडेनऊ हजारांची ही रक्कम होती. पत्नीने संमती दिल्यानंतर चिल्लर मोजण्यास दुपारी प्रारंभ झाला. चिल्लर मोजण्याचे काम बराच वेळ सुरू होते. न्यायालयात हा चर्चेचा विषय झाला.

किरकोळ कारणावरून या पती-पत्नीत वाद झाला. तो वाढतच जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले आहे. दीड वर्षापासून दावा सुरू आहे. न्यायालयाने महिना दोन हजारांची रक्कम पोटगी म्हणून मंजूर केली आहे. सुमारे ४५ हजारांची रक्कम पोटगीपोटी देणे बाकी होते. यापैकी पतीने काही दिवसांपूर्वी दहा हजार रुपये दिले. सोमवारी साडेनऊ हजार रुपये देण्यासाठी तो आला. येताना त्याने पोत्यात चिल्लर आणली. ती कोणी मोजायची, असा प्रश्‍न निर्माण झाला. चिल्लर असली तरी ते चलन आहे, ते स्वीकारलेच पाहिजे, असे पतीने सांगितले. चिल्लर मोजून देण्याचे निर्देश न्यायालयाने पतीला दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9500 rupees change for alimony by husband