आधारकार्ड क्रमांक नोंदवून खते विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नाशिक - जिल्ह्यातील एक हजार 400 विक्रेत्यांनी इलेक्‍ट्रॉनिक-पॉइंट ऑफ सेल अर्थात "ई-पॉज' मशिनद्वारे अनुदानित खतांची विक्री सुरू केली. शेतकऱ्यांना आधारकार्डवर अनुदानित रासायनिक खतांची विक्री करण्याचा राज्यातील पथदर्शी उपक्रम आजपासून नाशिक जिल्ह्यात सुरू झाला.

जिल्ह्यातील तीन हजार कृषीनिविष्ठा परवानाधारकांपैकी दोन हजार विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खते विक्रीसाठी कृषी विभागाकडे अधिकृत नोंदणी केली आहे. या नोंदणीच्या आधारे कृषी विभागाने शासनाकडे दोन हजार ई-पॉज मशिनची मागणी केली होती. मात्र, एक हजार 400 मशिन आले आहेत. त्याचे प्रशिक्षण व वितरण पूर्ण झाले आहे. मशिन स्वीकारलेल्या विक्रेत्यांनी आज शेतकऱ्यांच्या आधारकार्डची नोंदणी करून घेत अनुदानित रासायनिक खतांची विक्री केली. मूळ रकमेत शासनाने यापूर्वीच अनुदान दिलेले असल्याने खतांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आज फक्त इ-पॉज मशिनच्या आधारे विक्रीस प्रारंभ झाला आहे

आधारकार्ड क्रमांक नोंदवून इ-पॉज मशिनद्वारे अनुदानित रासायनिक खते विक्रीच्या नवीन पद्धतीला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विक्रेत्यांचीही कोणतही तक्रार आली नाही.
- अभिजित जमधडे, जिल्हा कृषी अधिकारी.

Web Title: Aadhar card number in response to farmers