आमदार किशोर पाटलांनी कथन केली आपबिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

आमदार किशोर पाटलांनी कथन केली आपबिती 
पाचोराः काश्‍मिरमध्ये ग्रेनेड हल्ल्यातून बचावलेले आमदार किशोर पाटील यांनी आज शिवसेना कार्यालयात आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात आपबिती कथन केली. यावेळी हल्ल्याचा थरार ऐकून उपस्थित सारेच भावुक अन सुन्न झाले. 

आमदार किशोर पाटलांनी कथन केली आपबिती 
पाचोराः काश्‍मिरमध्ये ग्रेनेड हल्ल्यातून बचावलेले आमदार किशोर पाटील यांनी आज शिवसेना कार्यालयात आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात आपबिती कथन केली. यावेळी हल्ल्याचा थरार ऐकून उपस्थित सारेच भावुक अन सुन्न झाले. 

आमदार पाटील यांनी सांगितले, या दौऱ्यात प्रथम लेह- लडाखला गेलो. मुक्कामानंतर पहलगाम येथे थांबलो व तेथून साडेअकराच्या सुमारास अनंतनाग मार्गे जात असताना पुढे सैनिकांची गाडी यामागे आमच्या आमदारांच्या पाच गाड्या. मागे पुन्हा सैनिकांची गाडी होती. अनंतनागपासून दोन किलोमीटरवर आमच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला झाला. आमच्या गाड्यांच्या ताफ्यातून मार्ग काढत एक तरुण मोटारसायकलने पुढे गेला होता आणि अनंतनाग ओलांडल्यावर त्याने गर्दीचा फायदा घेऊन वाहनांवर ग्रेनेड फेकला. सर्व गाड्यांचे नुकसान झाले. पाच गाड्या पुढे निघाल्या. मागे राहिलेल्या दोन गाड्यांवर स्थानिकांकडूनही दगडफेक झाली. आमच्या ताफ्यावर सात सेकंदाने फुटणारे ग्रेनेड फेकण्यात आले होते. मात्र, ते फुटेपर्यंत आमच्या गाड्या पुढे निघाल्या. मात्र, या हल्ल्यामुळे गाड्यांचे टायर व काच फुटून बाजारपेठेतील सुमारे 15 जण गंभीर जखमी झाले. सर्व गाड्या पुढे तीन किलोमीटरवर नेऊन टायर बदलवून सुरक्षारक्षकांसोबत आम्ही श्रीनगरला आलो. घडलेला प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रेम आणि शुभेच्छांमुळे जीवदान मिळाले. जनतेच्या कल्याणासाठीच यापुढे जीवन सार्थकी लावण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 
--------------------- 
भारतीय जवानांना सलाम 
काश्‍मिरमध्ये "आप इंडिया से हो क्‍या' असे ते विचारतात. काश्‍मीर भारताचा भाग असताना काश्‍मिरींनी असे विचारणे अत्यंत संतापजनक आहे. काश्‍मीरी आतंकवादी तरुणांचा बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने शस्त्रबंदी केलेली असताना हल्ला करण्यात आला. काश्‍मिरात कार्यरत असलेल्या भारतीय जवानांना खरोखरच सलाम केला पाहिजे अशी त्यांची कामगिरी असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: aapbiti