जिद्दीच्या बाळावर अभयचे उंच उडीत ‘सुवर्ण’

जिद्दीच्या बाळावर अभयचे उंच उडीत ‘सुवर्ण’

तळोदाः आसाममध्ये गुलाहाटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत नंदुरबारच्या अभय गुरव याने उंच उडीत २.७ मीटर एवढी उंच उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. याअगोदर त्याला राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. ‘खेलो इंडिया’तून  जिल्ह्याला मिळालेला हा मोठा बहुमान आहे.

अभयची खेळण्याची सुरूवात खोंडमळी गावातून झाली. उंच उडी खेळात नैपुण्य दाखविताना जिल्हा, राज्य अशा अनेक स्पर्धा त्याने गाजविल्या. विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे राष्ट्रीय ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत उंच उडी क्रीडाप्रकारात भारतात तिसरा येण्याचा मान त्याने पटकाविला होता, त्यावेळी त्याला कांस्यपदक मिळाले होते.

सध्या अभय इंडियन आर्मीत प्रशिक्षण घेत आहे. परिस्थितीवर मात करत आपले करिअर खेळातून होईल, या उद्देशातून दिवस रात्र फक्त प्रामाणित मेहनत, खेळ, खेळ आणि खेळ या हिमतीवर अभयने संपूर्ण देशात नाव कोरले. आई नसल्याने आत्याकडे लहानाचा मोठा झालेला अभय असंख्य अडचणींवर मात करत यापर्यंत पोचला आहे. उत्पन्नाचे साधन म्हणून कामालासुध्दा जावे लागले.

आपल्या जिल्ह्यातील तुटपुंज्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारच्या आधुनिक सरावची व्यवस्था नाही. यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (नंदुरबार) व आबाजी स्पोर्टच्या पाठबळामुळे अभय भारतात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत हे य़श मिळवू शकला. या यशामागे डॉ. मयूर ठाकरे यांचा वाटा आहे. बिकट परिस्थितीत सराव करत असताना स्वतः डॉ. ठाकरे यांनी त्यातील गुण ओळखत त्याचा कसून सराव घेत त्याला मार्गदर्शन केले.

अभयला कोणताही अनुभव नव्हता; परंतु मनात जिद्द, विविध राज्य संघटनांच्या स्पर्धांना जाऊन आलेला अनुभव यावर हे यश मिळवले आहे. खेळात पैसा हल्ली कमाई म्हणून बघितले जाते. मात्र, या क्लबमधील खेळाडूकडून फी घेत नाहीत, हे विशेष. मोफत क्रीडा प्रशिक्षण देऊन गरिबीमुळे मागे पडलेल्या खेळाडूंसाठी कार्य सुरूच आहे व यापुढेही सुरू राहील. यापेक्षाही मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, असे मत क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे.

"जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये खूप ताकद आहे. त्यांना योग्या मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यांना छोट्या-मोठ्या मैदानांवर असंख्य खेळाडू आपला घाम गाळत आहेत; परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे आपला खेळाडू मागे राहतो आहे. त्यांच्यामध्ये ती उर्जा निर्माण करा. जी राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक देईल, अशा प्रकारचे काम ज्यावेळी होईल, त्यावेळी जिल्ह्यात अनेक अभय गुरव आपल्याला पाहावयास मिळतील". – प्रा. डॉ. मयूर ठाकरे, क्रीडाशिक्षक, यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व आबाजी स्पोर्ट्स क्लब, नंदुरबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com