पोलीसाचीच कॉलर पकडून 'तो' म्हणतो "याला पंचवटीत घेऊ चला रे"

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबकगिरी गोसावी व पोलिस शिपाई सहाणे यांच्यासोबत सोमवारी रात्री तलावाडी भागात गस्त घालत होते. चार संशयित एका अंडाभुर्जीच्या हातगाडीवर मद्यसेवन करत गोंधळ घालताना त्यांना दिसले. बीट मार्शल पोलिस नाईक पगारे आणि होमगार्ड आहेर घटनास्थळी आले. त्यांनी संशयिताचे नाव विचारले असता संशयितांनी उलट हे बनावट पोलिस असल्याचे एकमेकांना सांगत पोलिसांकडे त्यांचे ओळखपत्र मागितले. 

नाशिक : गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी, तसेच त्यांच्या वॉकीटॉकीची तोडफोड केल्याप्रकरणी सोमवारी रात्री तलावाडी भागात पोलिसांनी चौघांना अटक केली. 

उलट पोलिसांकडेच ओळखपत्र मागितले. 

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबकगिरी गोसावी व पोलिस शिपाई सहाणे यांच्यासोबत सोमवारी रात्री तलावाडी भागात गस्त घालत होते. चार संशयित एका अंडाभुर्जीच्या हातगाडीवर मद्यसेवन करत गोंधळ घालताना त्यांना दिसले. बीट मार्शल पोलिस नाईक पगारे आणि होमगार्ड आहेर घटनास्थळी आले. त्यांनी संशयिताचे नाव विचारले असता संशयितांनी उलट हे बनावट पोलिस असल्याचे एकमेकांना सांगत पोलिसांकडे त्यांचे ओळखपत्र मागितले. 

पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ; चौघांना अटक
पोलिस त्यांना ओळखपत्र दाखवत असताना त्यातील एकाने श्री. गोसावी यांच्या गणवेशाची कॉलर पकडून "याला पंचवटीत घेऊ चला' असे म्हणत ओढले. त्यात शर्टाचे बटण तुटून पडले. दुसऱ्याने वॉकीटॉकी जमिनीवर पाडून त्यांना शिवीगाळ केली. दुसऱ्या वॉकीटॉकीवरून संदेश देत अतिरिक्‍त पोलिस बंदोबस्त मागविला. भद्रकाली गुन्हे शोधपथकाने जीवन गांगुर्डे (वय 18, रा. कोळीवाडा, मखमलाबाद), प्रशांत कडाळे (18, रा. मखमलाबाद), रोशन कटारी (24), मंगेश कटारी (24, दोघे रा. सिद्धार्थनगर, मखमलाबाद) अशा चौघांना अटक केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse the police by All four arrested Nashik Crime News