अवैधरित्या जनावरे वाहतूक करणा-या वाहनाचा अपघात

शशीकांत बिरारी : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

आज (ता.१) पहाटे पिकअप वाहन क्रमांक MH41 G3016 या वाहनातून अवैध मार्गाने चौदा गाई वाहून नेत असताना चौंधाणे गावाजवळ वाहनाचे मागचे टायर फुटल्याने वाहन एका बाजूस झूकले. त्यामुळे वाहनातील दोन गाईंचा मृत्यू झाला असून बाकी जनावरे जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले

बागलाण : सटाणा डांगसौदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावाजवळ मंगळवारी (ता.१) पहाटे नेण्यात येणा-या, गाई भरलेल्या पिकवाहनाचे मागचे टायर फुटले. वाहन एका बाजूला झूकल्याने त्यातील दोन गाईंचा मृत्यू झाला असून बाकी जनावरे जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे अपघात ग्रस्त वाहनाचा चालक वाहन सोडून पसार झाला आहे नागरिकांनी अपघात ग्रस्त वाहनातून हया जनावरांची सुटका करत जनावरांना चारापाण्याची सोय करत माणुसकीचे दर्शन घडविले. 

अपघातग्रस्त वाहनातून केली जनावरांची सुटका 
आज पहाटे पिकअप वाहन क्रमांक MH41 G3016 या वाहनातून अवैध मार्गाने चौदा गाई वाहून नेत असताना चौंधाणे गावाजवळ वाहनाचे मागचे टायर फुटल्याने वाहन एका बाजूस झूकले. त्यामुळे वाहनातील दोन गाईंचा मृत्यू झाला असून बाकी जनावरे जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत पावलेल्या गाईची उत्तरीय तपासणी करण्यात येत असून येथील नागरिकांच्या मदतीने मृत गाईना खड्ड्यात पुरण्यात आले.

जखमी जनावरांवर उपचार करून गो शाळेत रवानगी

जखमी जनावरांवर उपचार करून गो शाळेत रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. येथील उपसरपंच रविंद्र मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, पुंजाराम मोरे यांनी नागरिकांच्या मदतीने अपघात ग्रस्त वाहनातून जनावरांची सुटका करत जनावरांना चारापाण्याची सोय करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे  घटनेचा पुढील तपास सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस नाईक निलेश पवार, निरभवणे, बहीरम करीत आहेत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of animal transport vehicle illegally in baglan