औरंगाबाद नांदगाव मार्गावर अपघातात दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नांदगाव औरंगाबाद मार्गावर रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. इनोव्हा गाडीतून हे सर्व जण नाशिकहून औरंगाबादला साखरपुड्याला गेले होते.

नाशिक - नांदगाव औरगाबाद मार्गावरील तळवाडे घाटातील इनोव्हा गाडीचा अपघात होउन, दोघे ठार झाले. रात्री झालेल्या अपघातातील सर्व जण नाशिकचे आहेत. मृत
दोघात नाशिकचे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ऍड नीलेश कुलकर्णी तसेच डॉ. संदीप येवलेकर यांचा मृत्यू समावेश आहे.

नांदगाव औरंगाबाद मार्गावर रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. इनोव्हा गाडीतून हे सर्व जण नाशिकहून औरंगाबादला साखरपुड्याला गेले होते. तेथून नाशिकला येत असतांना नांदगाव मार्गावर अपघात झाला. त्यात गाडीने पलट्या खाल्याने हा अपघात झाला. गाडीत इतर पाच जखमीवर औरंगाबादला सिटी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये
उपचार सुरु आहे. 

नांदगावला सकाळी रेल्वेखाली झोकून देत युगलाची आत्महत्या 
मध्य रेल्वेच्या भुसावळ नांदगाव मार्गावरील सकाळी नांदगाव रेल्वेयार्डात परिसरातील रेल्वेमार्गावर युगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. तरुणाकडील कागदपत्रावरुन त्याच्या व त्याच्यासोबत आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटविली जात होती. सकाळी
धावत्या रेल्वेखाली झोकून देउन या दोघांनी आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी उघडकीस आला आहे.

Web Title: accident on Aurangabad-Nandgaon highway