नाशिक - भरधाव कार झाडावर धडकून एक ठार; चौघे जखमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नाशिक : अशोकस्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात कार हुतात्मा स्मारकाशेजारील झाडाला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये कारचालक जागीच ठार झाला तर कारमधील चौघे गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त कार चालक बाजूने चेपल्या गेली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधील चारही युवक हे पंचवटी, गणेशवाडीतील आहेत.

सरकारवाडा पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारच्या मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. होंडा अमेझ कार (एमएच 15 ईपी 1926) अशोकस्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. कारचालक गिरीश दीपक भरीतकर (22), रामेश्‍वर रमेश जाधव (16), नीलेश सुनील बडगुजर (25) व दोघे मित्र असे पाचही जण (सर्व रा. गणेशवाडी, पंचवटी) कारमध्ये होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकाजवळ कारचालक गिरीश भरीतकर याचा भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले आणि कार हुतात्मा स्मारकासमोरील रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यात कारचालक गिरीश भरीतकर या गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीतील चौघेजण जखमी झाले. 

मध्यरात्री झालेल्या अपघातात कार वेगात असल्याने झाडावर आदळली. त्यामुळे कारची चालक बाजू पूर्णपणे चेपली गेली आहे. अपघाताची माहिती कळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी विनोद राजेंद्र खैरे (रा. गणेशवाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: in accident of car 1 died 4 injured at nashik