PHOTOS : १५ मिनिटांचे थरार नाट्य..विचित्र अपघातात 'इतके' जण जखमी...

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

कंटेनर चालकाला ताबा मिळवता न आल्याने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक देत अखेर एका मालवाहू ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन,अखेर १५ मिनिटांच्या थरार नाट्यानंतर कंटेनर थांबला. मात्र आधी एकामागोमाग अनेक गाड्यांना जबर धडक दिल्याने,वेगवेगळ्या गाड्यामधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले

नाशिक : रविवारी (ता.३) सकाळी ९ च्या सुमारास नाशिककडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेला कंटेनरचे (MH 46 H 2988) कसारा घाटात ब्रेक फेल झाला, यामुळे कंटेनर चालकाला ताबा मिळवता न आल्याने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक देत अखेर एका मालवाहू ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन,अखेर १५ मिनिटांच्या थरार नाट्यानंतर कंटेनर थांबला. मात्र आधी एकामागोमाग अनेक गाड्यांना जबर धडक दिल्याने,वेगवेगळ्या गाड्यामधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले.

Image may contain: one or more people and outdoor

त्याचवेळी घाटातून प्रवास करत असलेले येवल्याचे सुनील पैठणकर,विनोद पाटील यांनी तात्काळ घटनेची माहिती संबंधित विभागाचे अधिकारी यांना दिली तर आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक महेश पैठणकर यांना सुनील पैठणकर यांनी सांगितले असता, तात्काळ जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी यांचे पथक घाटात पाठविले.

Image may contain: sky and outdoor

सुमारे दोन तासानंतर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू करण्यात कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.बी.महाले,राठोड व अधिकारी-कर्मचारी यांना यश आले. दरम्यान,संबंधित विभाग किंवा टोल वसुली करणारे,कंत्राटदार यांचे कोणीही उपस्थित नव्हतेच पण घाटातील सर्व गाड्या बाजूला करण्यासाठी ज्या क्रेन उपलब्ध करण्यात आल्या त्या अतिशय जुन्या आणि कालबाह्य,डबड्या स्वरूपाच्या असल्याने,प्रवासामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Image may contain: one or more people, people standing, tree, sky, outdoor and nature

दरम्यान,शेवटची धडक गॅस ट्रँकरला दिल्यानंतर घाटातील परिस्थिती फारच बिकट बनली होती.सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याने प्रवाशानी सुटकेचा निश्वास टाकला.

Image may contain: outdoor

Image may contain: sky and outdoor

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident due to driver being unable to recover at Kasara Ghat