अपघातमुक्‍त वर्षाचा वाहनधारकांनी संकल्प करावा - डॉ. जालिंदर सुपेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

अमळनेर - वाहन चालविताना विद्यार्थ्यांसह नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावेत. २०१७ हे वर्ष जिल्ह्यात अपघातमुक्‍त वर्ष होईल यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी धरणगाव येथे केले. 

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा पोलिस वाहतूक शाखेतर्फे होणाऱ्या सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

अमळनेर - वाहन चालविताना विद्यार्थ्यांसह नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावेत. २०१७ हे वर्ष जिल्ह्यात अपघातमुक्‍त वर्ष होईल यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी धरणगाव येथे केले. 

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा पोलिस वाहतूक शाखेतर्फे होणाऱ्या सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी मनीष कलोनिया, चोपडा विभागाचे पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी. के. पाटील, पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील, जैन इरिगेशनचे सी. एस. नाईक, डॉ. योगेश बाफना, पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गोठपाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. 

डॉ. सुपेकर पुढे म्हणाले, की विविध वाहनांनी प्रवास करत असताना घरच्यांना काळजी वाटते. या गोष्टीची जाणीव ठेवावी. हेल्मेट सीट बेस्टचा वापर प्रत्येकाने करावा. विद्यार्थ्यांनी आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक वापर करावा. शाळा महाविद्यालयात ये- जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा जोपासली गेली पाहिजे. योग्य पद्धतीने हेल्मेट, सीट बेस्टचा वार केला तर अपघातातही प्राण वाचू शकतात, असेही डॉ. सुपेकर यांनी सांगितले. यावेळी ९ ते २३ जानेवारी या सुरक्षा पंधरवड्यात वाहतूक शाखेतर्फे निबंध, चित्रकला, रांगोळी, वादविवाद अशा विविध स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांनी बक्षीस वितरणही करण्यात आले. इंदिरा गांधी विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरक्षा संदर्भात घेतलेल्या रांगोळी स्पर्धा पाहून उपस्थितांनी कौतुक केले. यात असुरक्षित वाहन चालविण्याचे परिणाम रांगोळीतून साकारण्यात आले होते. प. रा. विद्यालय, सारजाई कुडे, महात्मा फुले, इंदिरा गांधी, आदर्श विद्यालय, कला, वाणिज्य महाविद्यालय, ॲग्लो उर्दू हायस्कूल, बालकवी ठोंबरे, व्ही. जी. तात्या पाटील प्राथमिक, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आदी संस्थामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट काम करणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. जैन इरिगेशनतर्फे वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. पोलिस निरीक्षक रामेश्‍वर पाटील यांनी प्रास्ताविक केले. किरण चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी आभार मानले. 

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक 
विविध स्पर्धेतील सुमारे ७५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मतिमंद आणि दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांचे चित्र पाहून उपस्थित भारावून गेले. कार्यक्रम यशस्वितेसाठी धरणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, विजय देशमुख (पाळधी), हकीम शेख, जिल्हा वाहतूक शाखेचे आबा महाजन, ज्ञानेश्‍वर बागूल, जितेंद्र पाटील, इंदिरा गांधी विद्यालयाचे डी. एन. पाटील आदींनी सहकार्य केले. 

Web Title: Accident-free years will be vehicle owner