गोंदे दुमालातील अपघातात चार जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

वाडीव-हे ः मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाट्यावरील हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्विफ्ट कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी (ता.14) रात्री 11.45 वाजेदरम्यान घडला. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

नाशिकहून मुंबईकडे जाणा-या स्विफ्ट कारच्या (एम.एम.01, बी.जी.1561) चालकाने गतिरोधकावर अचानक ब्रेक दाबल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. ही कार मुंबईकडे जाणा-या ट्रकला (एम.एच.04, एफ.व्ही. 8854) मागून जोरात धडकल्याने या अपघातात राणीसाहेब पाटील (45), विजया रावसाहेब पाटील (32), प्रीती रावसाहेब पाटील (13), राजेश आदित्यप्रसाद पांडे (30), सर्व राहणार मुंबई) हे चारही जण गंभीर जखमी झाले. जखमींना गोंदे फाट्यावरील नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोंदे फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे मुंबईकडे जाणा-या गाड्या टोल रस्त्याने जात आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. बाजूलाच भाजी बाजार असल्यामुळे सायंकाळी येथे नागरिकांची गर्दी असते. याप्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख करीत आहेत.

Web Title: Accident at Gonde dumala Phata, 4 injured