Dhule News : धडक टाळण्याच्या नादात वाहनाला तापीत जलसमाधी; शिरपूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Dhule News : धडक टाळण्याच्या नादात वाहनाला तापीत जलसमाधी; शिरपूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले. वाहन उलटल्यानंतर मागाहून येणाऱ्या अवजड वाहनाने धडक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात पुलाचा कठडा तोडून अवजड वाहन तापी नदीपात्रात जाऊन कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Nashik News : वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

२३ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून मजुरांना घेऊन टेम्पो क्रूझर मध्य प्रदेशाकडे निघाली होती. सावळदे (ता.शिरपूर) येथील तापी नदीच्या पुलावर आल्यानंतर क्रूझरचा टायर फुटला. वाहनात सुमारे १५ मजूर होते. त्यातील चार जण दबले जाऊन जखमी झाले.

त्याच वेळी ट्रॅक्सच्या मागील बाजूने एक वाहन येत होते. त्याच्या चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कठडा तोडून वाहन नदीत कोसळून चालक व सहचालकाला जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंधारामुळे मदतकार्य सुरू होऊ शकले नाही. अपघातात जखमी सर्वजण मजूर असून कापूस वेचणी आटोपून गावी परत जात असल्याचे कळते.

हेही वाचा: Nashik News : कॉलेजरोडला कार थेट दुभाजकावरच; अंधुक पथदीपांमुळे घडली घटना

टॅग्स :Dhuleaccidentdeath